For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन कुटुंबामध्ये हजारमाचीत मारामारी

02:10 PM Jul 04, 2025 IST | Radhika Patil
दोन कुटुंबामध्ये हजारमाचीत मारामारी
Advertisement

कराड :

Advertisement

उत्तर हजारमाची (ता. कराड) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत तीन जण जखमी झाले. या मारामारी प्रकरणी दोन्ही बाजूच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी घरावर दगडफेक करून घरासमोर लावलेल्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. गुरुवार 3 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत विकास रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश शिवाजी जाधव (रा. उत्तर हजारमाची, ता. कराड) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विकास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी चुलते शिवाजी जाधव यांना ‘दादा, देवदेव करायचा. देवाजवळची झाडे कशाला काढायची, असे विकास जाधव बोलले. त्यावेळी शिवाजी जाधव यांनी ‘माझ्या पोराने लावलेली झाडे मी काढेन नाहीतर काहीपण करीन, तू मला कोण विचारणार?’ असे म्हणून प्रत्युत्तर दिले. त्यावेळी विकास जाधव याचा भाऊ विलास जाधव हा देखील तिथे आला. त्याच दरम्यान विकास जाधव याचा चुलत भाऊ महेश जाधव याने धारदार शस्त्राने विकास जाधव व विलास जाधव यांच्या पोटावर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. यामध्ये ते दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार काटवटे करीत आहेत.

Advertisement

तर महेश शिवाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास रामचंद्र जाधव, विलास रामचंद्र जाधव, सुनील रामचंद्र जाधव व विशाल विलास जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत महेश जाधव यांनी दिलेले फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वडील शिवाजी जाधव यांना चुलत भाऊ विकास जाधव शिव्या देऊन हाताने मारहाण करत होता. ते सोडवण्यासाठी महेश जाधव तेथे गेले असता विकास जाधव याने विटाने तसेच विलास जाधव, सुनील जाधव यांनी कळकाच्या काठीने मारहाण केली. तर विशाल जाधव यांनी हाताने मारहाण करून महेश जाधव यांना जखमी केले. तसेच घरावर दगडफेक करून घरासमोर लावलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.

Advertisement
Tags :

.