For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोव्हॅक्सिनमुळे साइड इफेक्ट्सचा दावा

07:00 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोव्हॅक्सिनमुळे साइड इफेक्ट्सचा दावा
Advertisement

भारत बायोटेककडून निर्मिती : किशोरवयीन-अॅलर्जिक व्यक्तींना समस्या : श्वसन-त्वचेच्या तक्रारी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारत बायोटेकच्या कोरोना व्हॅक्सिन-कोव्हॅक्सिनचे देखील साइड इफेक्ट्स असल्याचे एका अध्ययनानंतर म्हटले गेले आहे. स्प्रिंगरलिंगमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार बनारस हिंदू विद्यापीठात झालेल्या अध्ययनात भाग घेणाऱ्या जवळपास एक तृतीयांश लोकांमध्ये कोव्हॅक्सिनचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. किशोरवयीन, विशेषकरून किशोरवयीन युवती आणि एखाद्या अॅलर्जीला तोंड देणाऱ्या लोकांमध्ये हे दुष्परिणाम आढळून आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. तर कोव्हॅक्सिन निर्माण करणारी कंपनी भारत बायोटेकने ही लस सुरक्षित असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस टोचून घेतले होते. लस घेऊन एक वर्ष उलटलेल्या लोकांचा डाटा आम्ही जमविला. 1024 लोकांवर अध्ययन झाले. यात 635 किशोरवयीन आणि 291 प्रौढ सामील होते. अध्ययनानुसार 307 (47.9 टक्के) किशोरवयीन आणि 124 (42.6 टक्के) प्रौढांमध्ये श्वसनाशी निगडित इंफेक्शन (अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शन) आढळून आले. यामुळे लोकांमध्ये सर्दी, खोकल यासारख्या समस्या दिसून आल्याचा दावा अध्ययनकर्त्या शंख शुभ्रा चक्रवती यांनी केला आहे.

Advertisement

त्वचेशी निगडित आचार

अध्ययनात भाग घेतलेल्या किशोरवयीनांमध्ये त्वचेशी निगडित आजार (10.5 टक्के), नर्व्हस सिस्टीमशी निगडित डिसऑर्डर (4.7 टक्के) आणि जनरल डिसऑर्डर (10.2 टक्के) दिसून आले. तर प्रौढांमध्ये जनरल डिसऑर्डर (8.9 टक्के), स्नायू आणि हाडांशी निगडित डिसऑर्डर (5.8 टक्के) आणि नर्वस सिस्टीमशी निगिडत डिसऑर्डर (5.5 टक्के) आढळून आल्याचे अध्ययन अहवालात म्हटले गेले आहे.

गुलियन बेरी सिंड्रोम

कोव्हॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सवर झालेल्या अध्ययनात 0.3 टक्के लोकांमध्ये स्ट्रोक आणि 0.1 टक्के लोकांमध्ये गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस)चे निदान झाले आहे. जीबीएस या आजारात लकव्याप्रमाणे शरीराचा मोठा हिस्सा हळूहळू निशक्त होत जातो. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोकनुसार गुलियन बेरी सिंड्रोम एक दुर्लभ न्यूरोलॉजिकल आजार आहे. पूर्वीपासून एखादी अॅलर्जी असलेले किशोरवयीन किंवा प्रौढ महिलांना लसीकरणानंतर टाइफाइड होण्याचा धोका अधिक होता असेही अहवालात म्हटले गेले आहे.

कुठलेच दुष्परिणाम नाहीत : भारत बायोटेक

कोव्हॅक्सिनच्या सुरक्षेचे मूल्यांकन देशाच्या आरोग्य मंत्रालयाने केले होते. कोव्हॅक्सिन निर्मितीपासून लसीकरणापर्यंत सातत्याने सुरक्षा निरीक्षण करण्यात आले होते. कोव्हॅक्सिनच्या परीक्षणाशी निगडित सर्व अध्ययनं आणि सेफ्टी फॉलोअप अॅक्टिव्हिटीजमधून कोव्हॅक्सिनची प्रभावी सुरक्षा समोर आली आहे. आतापर्यंत कोव्हॅक्सिनमुळे ब्लड क्लॉटिंग, थ्रॉम्बोसाइटोपीनिया, टीटीएस, व्हीआयटीटी, पेरिकार्डिटिस, मायोकार्डिटिस यासारख्या कुठल्याही आजाराचे एकही प्रकरण समोर आले नसल्याचा दावा भारत बायोटेक या कंपनीने केला आहे. अनुभवी इनोव्हेटर्स आणि प्रॉडक्ट डेव्हलपर्स म्हणून भारत बायोटेकची टीम कोरोना लसीचा प्रभाव की काळासाठी असू शकतो, परंतु रुग्णाच्या सुरक्षेवर याचा प्रभाव आयुष्यभर राहू शकतो हे जाणून आहे. याचमुळे सर्व लसींकरता सुरक्षेवर आमचा भर असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.