शहरातील वाहतुकीचे तीन तेरा! वाहतुक सुरळीत सुरू करण्याकडे वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष
चौकाच्या कोपऱ्यात मोबाईल पाहत उभे असतात वाहतुक पोलीस; महिनोमहिने रस्त्यावरच भंगार वाहने; रस्त्यावरच अवैध वाहन पार्किंग
कोल्हापूर प्रतिनिधी
शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडून गणेशोत्सव काळात शहरातील वाहतुकीला शिस्त आणि ठोस असे नियोजन करण्यात आले नाही. त्याचबरोबर शहर वाहतुक पोलीस चौका-चौकात कर्तव्य बजावत असताना चौकातील वाहतुक सुरळीत कशी सुऊ राहिल हे पाहता, चौकाच्या एका कोपऱ्यात उभे राहून, मोबाईल पाहात राहत आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांच्या वागणूकीमुळे वाहतुकीच्या कोंडीमध्ये आणखीन भरीत भर होवू लागली आहे.
शहरात वाहनाची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या आणि अऊंद रस्ते यामुळे वाहतुक कोंडीची समस्या वाढत आहे. यांची दखल घेवून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहर वाहतुक नियंत्रण शाखेला पुरेसे पोलिसांची संख्याबळ पुरविले आहे. शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांकडून दररोज कोण पोलीस कर्मचारी कोणत्या चौकात आणि क्रेनवर कोण यांची नेमणूक केली जाते. पण नेमणूक केलेला पोलीस कर्मचारी चौकामध्ये उभा राहून, चौकातील वाहतुक सुरळीत करण्याची ड्युटी चोखपणे बजावत आहे की नाही. यांची शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याकडून पडताळणी केली जात नाही. त्यामुळे शहर वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी चौका-चौकात उभे न राहता, चौकाच्या एका कोपऱ्यात उभे राहून मोबाईल पाहण्यास धन्यता मानू लागल्याने, वाहन चालकांच्या बेशिस्त वागणूकीमुळे वाहतुकीची कोंडी होवू लागली आहे.
शहरातील वाहतुकीच्या कोंडीत सण, समारंभ आणि मंत्री महोदयांच्या दौऱ्यामुळे आणखीन भर घालली जात आहे. या कोंडीमुळे शहरवासीयांबरोबर बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवासाचा प्रवासामध्ये बराच वेळ जाऊ लागला आहे. तसेच वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांच्यामध्ये किरकोळ वाद देखील होवू लागले आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये चिडचिडचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. वाहतुक कोंडीमुळे वाहनामधील इंधन मोठ्या प्रमाणात जळू लागल्याने, यांची झळ वाहनधारकांच्या खिश्याला बसू लागली आहे.
गणेशोसव सणामुळे सार्वजनिक गणेश मंडळानी रस्त्यावरच मोठेच्या मोठे गणेश मंडप उभालेले आहेत. शहरातील अनेक रस्त्यावरील वाहतुक बंद झाल्यामुळे गणेशोत्सव काळात शहरातील वाहतुक कोंडीची समस्या आणखीन वाढल्याने, शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडून शहरातील वाहतुकीला शिस्त आणि ठोस असे नियोजन करणे आवश्यक होते. पण त्यांच्याकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले नाही. यांचे प्रातिनिधी उदाहरण म्हणजे दसरा चौक ते व्हिनस चौक या मार्गावरील जयंती नाल्याच्या पुलावर परिसरातील वाहन व्यावसायिकांनी आपली जुनी चार चाकी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी केली आहेत. तर दसरा चौक ते सीपीआर चौक या रस्त्यावर एका बाजूला हातगाडीवाले आणि अवैधपणे ऊग्णवाहिका उभ्या केला जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला वडापच्या चार चाकी आणि तीन चाकी रिक्षा उभ्या राहत आहे. दसरा चौक ते आईसाहेब पुतळा या मार्गावरील वडाप पाव, चहाच्या टपऱ्यामुळे वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी कऊ लागला आहे. अशीच अवस्था शहरातील मुख्य रस्त्याची आणि चौका-चौकाची आहे.
यांची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, शहर पोलीस उपाअधीक्षक अजित टिके यांनी गांभीर्याने दखल घेवून, अनेक दिवसापासून रस्त्यावरच पार्किंग कऊन उभी केलेली चार चाकी वाहने क्रेनने उचलून, संबंधीत वाहन मालकाविरोधी कारवाईची धडक मोहिम हाती घेणे गरजे आहे. अन्यथा गणेश मंडळाचे देखावे सुऊ झाल्यानंतर, शहरातील वाहतुकीचे आणखीन तीन तेरा वाजणार यामध्ये मात्र शंका नाही.
रस्त्यावर बॅरेकेट लावून केले एकाने पार्किंग
शहरातील पाच बंगल्याकडून बागल चौकाकडे जो रस्ता गेला आहे. त्या रस्त्यावरील बीटी कॉलेज समोरील एका मोठा खासगी हॉस्पीटलच्या डॉक्टरने हॉस्पीटलच्या पार्किंगसाठी रस्त्यावर भंगार ऊग्णवाहिका उभी केली आहे. त्या ऊग्णवाहिकेपासून शाहुपूरी वळसा घेण्यापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरच स्वत:चे लोखंडी बॅरेकेट लावून, हॉस्पीटलचे विशेषत: स्वत:ची चार चाकी लावण्यासाठी पार्किंग केले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होवू लागली आहे. हे बेकायदेशिर पार्किंगकडे हटवून, या भागातील वाहतुकीची कोंडी दुर करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांच्याबरोबर वाहनधारकांच्यामधून होवू लागली आहे.