For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

10:24 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
शहर  तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
Advertisement

केएलएसचा अनुज हनगोजी वैयक्तिक विजेता

Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक क्रीडा स्पर्धेंचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. प्राथमिक विभागात केएलएस स्कूलचा अनुज हनगोजीने वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. नेहरुनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे  बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, शहर शारीरिक शिक्षणाधिकारी जे. पी. पटेल, जिल्हा शारीरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटमुरी, रमेश सिंगद, एल. बी. नाईक, अनिल कांबळेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी राजू सेठ यांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले. तालुक्यातील चार विभागातील खेळाडूंनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. राष्ट्रीय खेळाडू साक्षी खंदारे, शिवानी शेलार, प्रतीक्षा मोहिते, ऋतुजा सुतार यांनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. क्रीडापटू नेत्रावतीने सर्व खेळाडूंना शपथ देवविली. याप्रसंगी लिलावती हिरेमठ, रवी बजंत्री यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी उमेश बेळगुंदकर, प्रवीण पाटील, प्रशांत देवदामन, बापू देसाई, अॅन्थोनी डिसोजासह इतर क्रीडाशिक्षक उपस्थित होते. प्राथमिक विभागात केएलएस स्कूलच्या अनुज हनगोजीने 200 मी., 400 मी. व 600 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र, चषक व पदके देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.