नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
कोल्हापूर :
चीनमधील एचएमपीव्ही विषाणूचा आता भारतातही शिरकाव झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. कर्नाटक तसेच गुजरातमध्ये एचएमपीव्हीचा रुग्ण आढळून आल्याचे वृत्त आहे. एचएमपीव्ही विषाणूबाबत राज्यातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, राज्यातील आरोग्य यंत्रणा संतर्क आहे. एचएमपीव्ही विषाणूबाबत खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी काळजी करुन नये, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
मंत्री आबिटकर यांनी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास भेट देवून सुविधांबाबत पाहणी केली. यावेळी चीनमधील एचएमपीव्ही विषाणूबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, सोशल मीडिया तसेच एकमेकांच्या बोलण्यामधून विनाकारण भिती निर्माण होते. येत्या एक-दोन दिवसात बैठक घेवून आरोग्य विभागाच्या अधिक्रायांना याबाबत सूचना देण्यात येतील. सर्व परिस्थितीवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
एमएमपीव्ही व्हायरसबाबत इतर संसर्गजन्य आजाराप्रमाणेच काळजी घ्या. हात स्वच्छ धुणे, शिंकताना खोकताना रुमाल वापरणे, आदी आवश्यक सुचनांचे पालन करावे असे आवाहन राज्यातील जनतेला असे अवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.