महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अन्यथा सनबर्न उधळून लावणार

11:44 AM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार प्रवीण आर्लेकर यांचा सडेतोड इशारा : आर्लेकरांच्या नेतृत्वाखारी हजारो लोकांचा विरोध, सरकार तसेच पर्यटमंत्र्यांवर केली कडाडून टीका

Advertisement

पेडणे : धारगळ येथे होऊ घातलेल्या सनबर्न इडियम फेस्टिवलला काल रविवारी धारगळ येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांना सोबत घेऊन जोरदार विरोध दर्शविला. पेडणे तालुक्मयातील सुमारे तीन हजार नागरिक या सनबर्नच्या विरोधात एकटवले होते. पेडणे तालुक्मयात सनबर्नला कुठल्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. आपण पेडणेतील जनतेसोबत आहे. सनबर्न धारगळ सोडून पेडणे तालुक्यातील इतर कुठेही होत असेल तिथेही सनबर्नच्या विरोधात राहणार आहे. जर सरकारने लोकभावनेची कदर न केल्यास लोकांना सोबत घेऊन सनबर्न उधळून लावणार असल्याचा इशारा पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सरकारला दिला आहे.

Advertisement

जे लोकांना मतदारसंघात नको, ते आपल्यालाही नको, असे आर्लेकर पुढे म्हणाले. मला पेडण्यातील जनतेने निवडून दिलेले आहे. आपण त्यांच्या हितासाठीच कार्यरत राहणार आहे. यापूर्वी आपण टॅक्सी व्यवसायिकांच्या सोबत राहिलो आणि त्यांना न्याय मिळवून दिला, असेही आर्लेकर म्हणाले. या जाहीर सभेला धारगळ पंचायत परिसरात सायंकाळी सुऊवात झाली. यावेळी पेडणे तालुक्मयाच्या तसेच पेडणे मतदारसंघाच्या विविध भागातून सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते, विविध पंचायतीचे पंचायत सदस्य, सरपंच तसेच  मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने जमा होऊन या सभेला त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आणि सनबर्नला विरोध केला.

सनबर्न ही गोव्याची संस्कृती नाही

सनबर्न धारगळ येथे आयोजित करण्यामागे एक अतृप्त शक्ती आहे. या अतृप्त शक्तीला पेडणेतील जनतेने बाहेर फेकले पाहिजे. सनबर्न विरोधात आमदार प्रवीण आर्लेकर यांनी जो पुढाकार घेतला त्यासाठी आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. सनबर्नच्या विरोधात सर्वांनी एकसंघ होऊन हा वाईट प्रवृत्तीचा प्रकार पेडणे तालुक्मयातून हद्दपार करावा, असे आवाहन यावेळी प्रशांत मांद्रेकर यांनी केले.

सनबर्नला हाकलून लावुया

धारगळ पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत सदस्य भूषण नाईक म्हणाले की सनबर्नसाठी धारगळ पंचायतीला अर्ज आलेला आहे. मागील ग्रामसभेत आम्ही आणि ग्रामस्थांनी त्या अर्जाला कडाडून विरोध केला. पंचायतीने लोकांची भावना लक्षात घेऊन त्याला पंचायतीची परवानगी देऊ नये. वाईट प्रवृत्ती आणि ड्रग्जच्या विळख्यात आमची युवा पिढी बरबाद होऊ नये, यासाठी सर्वांनी एकसंघ राहून सनबर्न धारगळमधून हाकलून लावुया असे आवाहन त्यांनी केले.

सनबर्नचा अर्ज फेटाळून लावावा 

माजी सरपंच तथा विद्यमान पंच अनिकेत साळगावकर यांनी या सनबर्न फेस्टिवलला ग्रामसभेत कडाडून विरोध झाल्याचे सांगितले. आज सोमवारी पंचायत मंडळाची बैठक असून त्यात सनबर्नचा परवानगी मागणारा अर्ज फेटाळून लावण्याची गरज आहे. आज हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांबरोबर आमदार आर्लेकर आहेत, यापुढेही असेच आमदारांनी आमच नेतृत्व करावे. सर्वजण मिळून सनबर्नला हाकलून लावुया, असेही ते म्हणाले.

सांखळीत फुटबॉल, क्रिकेट अन् पेडणेत सनबर्न?

तोरसेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजप पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सावळ म्हणाले की सांखळी मतदारसंघातील युवकांनी फुटबॉल आणि क्रिकेटचे सामने खेळायचे, मात्र पेडणे तालुका जो सुसंस्कृत आहे, ज्या भूमीला इतिहास आहे, अशा भूमितील युवकांना बिघडवण्यासाठी सनबर्नसारख्या वाईट गोष्टीचे आयोजन सरकार का करत आहे? सांखळीत खेळ अन् पेडणेत सनबर्न वाईट प्रवृत्ती कशाला? अशा या महोत्सवाला आमचा कडाडून विरोध आहे, असेही ते म्हणाले.

आमदार जनतेसोबत आहेत, ही चागंली गोष्ट

वास्को येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी या सभेला खास उपस्थित राहिले. पेडणे मतदारसंघाचे आमदार आणि भाजप पक्षाचे आमदार असलेले प्रवीण आर्लेकर यांनी सरकारच्या विरोधात आणि सनबर्नच्या विरोधात जे पाऊल उचलले  आहे, ते योग्यच आहे. आमदारांच्या सोबत पेडण्यातील जनता आहे, हे या सभेवरून दिसून आले आहे. आमचाही या सनबलला तीव्रतेने विरोध आहे, असे त्यांनी सांगितले.

पेडण्यात सनबर्न हे अत्यंत दुर्दैवी

गोवा राज्यात यापूर्वी विविध ठिकाणी सनबर्न महोत्सव समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. मात्र आता हा महोत्सव शांततामय, संस्कृती जपणाऱ्या पेडणे तालुक्मयासारख्या तालुक्यात होतोय, अत्यंत दुर्दैवी आणि वाईट बाब आहे. पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या विरोधात आज उचललेले पाऊल अभिनंदन करणारे असून त्यांनी शेवटपर्यंत या लोकांसोबत राहावे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे रामा काणकोणकर म्हणाले.

पर्यटनमंत्र्यांनी सनबर्न पर्वरीत करावा

मांद्रे पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत सदस्य अमित सावंत म्हणाले की पेडणे तालुक्मयात सुशिक्षित आणि सुसंस्कृती जपणारे लोक राहतात. या तालुक्मयात अशा प्रकारचे वाईट प्रवृत्तींना खतपाणी घालणारे महोत्सव सरकारने आयोजित करू नये. पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी हा महोत्सव पर्वरी येथील क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करावा. ही वाईट संस्कृती पेडणेकरांवर लादू नये.

आमदार आर्लेकर लोकांसोबत आहे, हे महत्वाचे

मिशन फॉर लोकलचे प्रमुख राजन कोरगावकर म्हणाले की सनबर्न महोत्सवाला विरोध करून पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपण लोकांसोबत आहे हे दाखवून दिलेले आहे. आज मोठ्या संख्येने लोक सनबर्नच्या विरोधात जमा झालेले आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेऊन हा महोत्सव अन्य ठिकाणी हलवावा जेणेकरून आमची संस्कृती आणि पेडणेकर जे सुजाण आहेत, जे संस्कृतीमय वातावरण आहे ते बिघडणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, असे कोरगावकर म्हणाले.

पार्सेचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र प्रभू देसाई म्हणाले की पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर लोकांसोबत आहेत, तसेच मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनीही आज या ठिकाणी सभेत येणे गरजेचे होते. त्यांनी अशा वाईट गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये. धारगळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर यांनी सांगितले की दुपारी आमच्या घरी नोटिसा पाठवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केलेले आहे. आम्ही सनबर्नसारख्या वाईट प्रवृत्तींना विरोध करतो म्हणून आम्हाला घाबरून सोडण्याचे काम सरकार करत आहे. इब्रामपूर पंचायतीचे सरपंच अशोक धावस्कर म्हणाले की सरकारने जर हा महोत्सव धारगळमधून हटवला नाही तर आर्लेकर यांनी सरकारमधून बाहेर पडून राजीनामा द्यावा.

भास्कर नाऊलकर, जितेंद्र गावकर, कृष्णा नाईक, तुये पंचायत सदस्य उदय मांजरेकर, माजी सरपंच गौरी जोसलकर, तोरसे सरपंच छाया शेट्टी, बबन नाईक, सुरेश कारापूरकर, पुंडलिक धारगळकर, प्रसाद शहापूरकर, भारत बागकर, रोहिदास हरमलकर आदींनी यावेळी भाषणे करून सनबर्नला कडाडून विरोध दर्शविला. सभेनंतर फेरी काढून फेस्टिवलला विरोध दर्शवण्यात आला. यावेळी सरकारतर्फे दोन बसगाड्या पोलिसांच्या येऊन दुपारपासूनच तैनात होत्या. सभेत उपस्थित राहू नये, म्हणून पोलिसांनी काहीजणांना नोटिसा बजवल्याची काहीनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article