नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आवाहन : चिकुनगुनिया, डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव
वार्ताहर/ उचगाव
उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून सध्या पावसाळी हंगामाला सुऊवात झाली आहे. नदी, नाले आणि पिण्याच्या सार्वजनिक विहिरींनाही गढूळ पाणी आले आहे. यासाठी म्हणून कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी, आपले आरोग्य सांभाळण्यासाठी व संभाव्य होणारे आजार म्हणजे सर्वत्र मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी व खबरदारीचे उपाय म्हणून आरोग्य खात्याच्यावतीने कळविण्यात येते की, पुढील दिलेल्या आरोग्य खात्याच्या सूचनेप्रमाणे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पुढील दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून आपले आरोग्य सांभाळा, असे आव्हान करण्यात आले आहे.
चिकुनगुनिया व डेंग्यू आजार एडिस ईजिप्सी डासामार्फत पसरतो. चिकुन गुनिया, डेंग्यू ताप हे विषाणूजन्य रोग आहेत. चिकुनगुनिया ताप व चिकन याचा काहीही संबंध नाही. एडिस ईजिप्सी डासांच्या पायावर व पंखावर पांढरे पट्टे असतात. त्यामुळे हा डास ओळखणे अत्यंत सोपे असून यास बोलीभाषेत टायगर मॉस्किटो म्हणतात. चिकुनगुनिया तापामध्ये तीव्र स्वरूपाचा ताप, अंगदुखी, सांधेदुखी या तक्रारी जाणवतात. यावर कोणत्याही शासकीय दवाखान्यात मोफत औषधोपचार केला जातो. एडीस ईजिप्सी डास दिवसा चावतो व घरातील अडगळीच्या ठिकाणी राहतो. एडीस डास स्वच्छ घरगुती साठवलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतो. उदाहरणात हौद, बॅरल, टाकी. डासांच्या तीन अवस्था अंडी, अळी, कोष, पाण्यातील असून यासाठी सात ते आठ दिवस लागतात. त्यानंतर त्यास पंख येऊन डास पूर्ण अवस्थेत तयार होतो. डासावर नियंत्रण ठेवायचे असल्यास डासांचे जीवन चक्र खंडित करणे अत्यावश्यक असल्याने प्रत्येक सात दिवसांनी घरगुती पाणीसाठा, हौद, बॅरल, टाक्मया वगैरे रिकामी करून घासून कोरडी करून पाणी भरणे आवश्यक आहे. घरासमोरील अस्ताव्यस्त पडलेल्या निऊपयोगी टायर, फुटक्मया बाटल्या, नारळाच्या करवंटी, वॉटर कुलर इत्यादी ठिकाणी डास उत्पादित झपाट्याने होते. म्हणून निरोपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परिसर स्वच्छता, डबकी बुजवणे, गटारी वाहती करणे गरजेचे आहे. डासोउत्पत्तीच्या ठिकाणी डास, अळी, भक्षक, गप्पी मासे सोडावेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी मागणी केल्यास गप्पी मासे मोफत पुरवण्यात येतील. मच्छर अगरबत्ती, रिपीलंट मलमाचा वापर करावा व मच्छरदाणीचा नियमित वापर करावा, 15) पाणी रोज उकळून थंड करून स्वच्छ पाणी प्यावे. शिळे अन्न खाऊ नये. या सर्व खबरदारी घेतल्यास आपले आरोग्य चांगले राहील, असे आवाहन उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्याधिकारी डॉ. स्मिता गोडसे यांनी आरोग्य खात्याच्यावतीने केले आहे.