Sangli : पलूस कृषी प्रदर्शनातील हिंदकेसरी गजेंद्र रेडा पाहण्यासाठी नागरिकांची रेलचेल
यशवंत कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद
पलूस : पलूस मध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या यशवंत कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरलेल्या हिंदकेसरी गरजेंद्र रेडा खातो काय, याची चर्चा पलूस सह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात होवू लागली आहे.
कर्नाटक राज्यातून मंगसुळी येथून दाखल झालेला गजेंद्र रेडा पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करू लागले आहेत. या रेड्याचे वैशिष्टये म्हणजे हा रेडा उंचीने कमी असला तरी वजानाने दीड टन आहे. दुपारी दोन तास झोप घेतो. दररोज चार ते पाच किलो सफरचंद सोबत पंधरा लिटर दूध पितो, असा त्याचा खुराक ठरलेला आहे. शरिराने धिप्पाड असणारा रेडा पाहण्यासाठी व त्यांचा फोटो काढण्याचा मोह अनेकांना होतो.
प्रदर्शनामध्ये विविध स्टॉल्स पाहून झाल्यानंतर शेवटी लोक हिंदकेसरी गजेंद्र रेड्याजवळ घुटमळतात. त्याच्या वजनाची व शरिरष्ठीची पाहणी करतात. पलूसकरांसाठी रेडा पाहणे हा एक कुतहलाचा विषय बनला आहे. कृषी प्रदर्शनामध्ये शासकीय योजनाच्या स्टॉल्स पासून ते सौदर्य, कपडे, दागिणे, इलेक्ट्रीक वस्तू व खाद्य पदार्थाचे स्टॉल्स उभारण्यात आलेत.
गेल्या आठ वर्षापूर्वी आ.अरूण यांच्या वाढदिवसानिमित्त असे प्रदर्शन भरवण्यात आले व होते. त्यानंतर प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत कृषी प्रदर्शन होत असल्याने ते पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होवू लागली आहे. प्रदर्शन पाहून झाल्यानंतर बाहेर पडताना गजेंद्रला भेटल्या शिवाय प्रदर्शनची फेरी पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. गजेंद्रच्या मालकानेही गजेंद्रच्या गळयात व पायात रंगेबीरंगी गोहे घातले आहेत. तसेच शिंगे रंगवली आहेत. टुमदार दिसणाऱ्या रेहयाबरोबरच बदक व विविध प्रकारच्या कोंबहुधा, या प्रदर्शनाचे लक्ष वेधून घेत आहेत.