For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोनवाळ गल्लीतील ई-आस्थी केंद्र बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय

10:34 AM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोनवाळ गल्लीतील ई आस्थी केंद्र बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय
Advertisement

बेळगाव : महापालिकेच्या कोनवाळ गल्ली येथील विभागीय कार्यालयामध्ये ई-आस्थी नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्या ठिकाणचा कक्ष बंद ठेवण्यात आला असल्याने ए व बी खाते मिळविण्यासाठी येणाऱ्या मिळकत धारकांना माघारी परतावे लागत आहे. याकडे मनपा आयुक्तांनी लक्ष घालून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement

यंत्रणेत बिघाड झाल्याचे कारण

शहर व उपनगरातील मालमत्तांना गेल्या आठ महिन्यापासून ई-आस्थी प्रणाली अंतर्गत नोंद करून घेऊन त्यांना ए व बी खाता दिला जात आहे. सुरुवातीला महापालिकेच्या मुख्य कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांसह बेळगाव वन केंद्रांमध्ये देखील अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्वीकारली जात आहेत. त्या ठिकाणी एक ऑपरेटर, कॉम्प्युटर, स्कॅनर व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोनवाळ गल्लीतील कार्यालयातदेखील स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला होता. पण यंत्रणेत बिघाड झाल्याचे कारण सांगून ई-आस्थीसाठी अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.