Satara News : बढीये पेट्रोल पंपाशेजारील धोकादायक टपरी हटवण्याची नागरिकांची मागणी
सातारा नागरिकांचा पेट्रोल पंपासमोर धोकादायक टपरीविरोध
सातारा : पोवई नाका परिसरातील बढीये पेट्रोल पंपासमोर असलेली अनधिकृत चहाची टपरी तातडीने हटवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून याबाबतचे निवेदन सातारा बाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांना देण्यात आले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा मोठ्या प्रमाणावर साठा असतो. पंपाच्या आसपास महाविद्यालये, दवाखाने आणि
सततची वर्दळ असते. अशा परिस्थितीत पेट्रोल पंपासमोरच उभारण्यात आलेल्या अनधिकृत चहाच्या टपरीमुळे नेहमीच वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. टपरीबर में स वापरला जात असल्यामुळे पेट्रोल पंपाला आगीचा धोका संभवतो.
भविष्यात निष्काळजीपणामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून टपरी हटवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.