For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोडोली - डोणोली मार्गावरील रुंदीकरणाचे रेंगाळल्याने नागरिक त्रस्त

12:11 PM Dec 17, 2023 IST | Kalyani Amanagi
कोडोली   डोणोली मार्गावरील रुंदीकरणाचे रेंगाळल्याने नागरिक त्रस्त
Advertisement

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास आंदोलन होणार

Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

पन्हाळा तालुक्यातील कोडोली - डोणोली प्रमुख मार्ग जिल्हा परिषदे कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाल्याने सद्या या मार्गाचे सुरु असलेले रुंदीकरणाचे काम सातवे येथे रेंगाळल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.सातवे येथे रुंदीकरणात साईडपट्या उकरून खडीने भराव भरून त्यांच्या मजबूती करण्याचे काम सुरू आहे मोठी वाहने ये जा चालू असताना पादचारी दुचाकी स्वार यांना त्रासचे होऊ लागले आहे काही ठिकाणी तात्पुरता पर्यायी मार्ग करणे गरजेचे आहे आशा ठिकाणी तो केलेला नाही त्यामुळे दळण वळणास अडचणी येत आहेत.

Advertisement

सातवेतील प्रमुख मार्गावर जिथे रुंदीकरण सुरु आहे तेथील साईड पट्टीच्या खालून गावाला पुरवठा करणाऱ्या पाण्याची मुख्य पाईप लाईन आहे तेथे साईडपट्टी उकरताना पाईप लाईन फुटल्यास त्याची दुरुस्ती ठेकेदाराने करावी अशी भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे तर ठेकेदाराने त्यास नकार दिल्याने ग्रामपंचायतीने यावर हरकत घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाईप लाईन करताना कोणाची मंजूरी घेतली होती असा प्रश्न उपस्थित केला आहे तर ग्रामपंचायत सरकारी कामाचा भाग आहे जनतेच्या सोयीसाठी पाणी पुरवठा योजना आहे या उलट जिल्हा परिषदेने आम्हाला विचारून रस्ता हस्तांतरण केलेला नाही असे वार पलटवार सुरु आहेत त्यामुळे रुंदीकरणाचे काम रेंगाळत चालले आहे.

कोडोली - डोणोली प्रमुख जिल्हा मार्ग नियमाने जेवढ्या प्रमाणात रुंदीचा असायला हवा तेवढा नाही अनेक ठिकाणी यावर अतिक्रमने आहेत काखे फाटा ते मोहरे फाटा येथे पर्यन्तचा मार्ग अजूनही ग्रामीण मार्ग आहे जिल्हा परिषदेने ठराव देवून देखील हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्गात हस्तांतरण झालेला नाही त्यामुळे हा प्रमुख जिल्ह मार्ग पूर्ण कसा दाखवला जातो अनेक ठिकाणी एकेरी मार्ग आहे रस्त्याला लागून असलेली अतिक्रमणे हटविण्याची मागणी आहे तसेच दोन्ही बाजूला असणारी झाडे झुडपे काढून हद्दी निश्चित करून चर मारण्याची गरज आहे.

कोडोली - डोणोली मार्गावर आजपर्यंत गत पाच सात वर्षात सातत्याने खर्च टाकून रस्ता केला आहे त्याची डागडूजी कधी केली जात नाही नवीन केलेल्या रस्ता दर्जाहीन होत असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी तसेच पाणी पुरवठा योजना व अन्य सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई द्यावी यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच उत्तम नंदुरकर यानी दिला आहे.

Advertisement
Tags :

.