कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Circuit Bench Kolhapur: सर्किट बेंचमुळे पक्षकरांना लवकर न्याय मिळणार

12:30 PM Aug 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पक्षकारांचे न्यायदानासाठी आंतर कमी झाले असून यापूढे त्यांना न्याय लवकर मिळणार

Advertisement

गडहिंग्लज : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच होत असल्याने 40 वर्षांच्या प्रखर लढ्याला यश आले. यामुळे पक्षकारांचे न्यायदानासाठी आंतर कमी झाले असून यापूढे त्यांना न्याय लवकर मिळणार, अशी भावना गडहिंग्लज तालुका बार असो. च्या पदाधिकारी, सदस्यांनी व्यक्त केल्या.

Advertisement

खंडपीठाचे नोटीफेकशन प्रसिध्द झाल्याबद्दल बार असो. च्या वतीने दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक आतिषबाजी करुन आनंद साजरा केला. गडहिंग्लज येथे अभिनंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी बार असो.चे अध्यक्ष अॅड. आनंदा सावंत, अॅ. अर्जुन रेडेकर, सरकारी वकील अॅड. राजेंद्र तेली यांची प्रमूख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन केले. यावेळी अॅड. तोडकर, अॅड. एस. बी. तेली, अॅड. पी. एस. फराकटे, अॅड. बी. बी. घाटगे आदींनी मनोगते व्यक्त केले. सर्किट बेंचच्या कामकाजात गडहिंग्लज बार असो.च्या पदाधिकारी, सदस्यांनी पक्षकरांना न्याय देण्याचे आवाहन केले.

मनोगत अॅड. आनंदा सावंत यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन अॅड. आर. एम. कोले यांनी केलेकार्यक्रमास असो. चे उपाध्यक्ष शंकर निकम, सचिव विलास नाईक, अॅड. अक्षय गुरव, अॅड. महेश पाटील, अॅड.शिवाजी पाटील, अॅड. शीतल साळवी, अॅड. राजेखान मुल्ला उपस्थित होत

व्यापारी-उद्योग क्षेत्रात सर्किट बेंचमुळे आनंद

कोल्हापूर : सर्किट बेंचच्या निर्णयाने व्यापार-उद्योग जगतात आनंदाची भावना निर्माण झाली, अशी भावना व्यापारी-उद्योजकांनी व्यक्त केली. जिल्हा बार असोसिएशनने, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न व्यापारी-उद्योजकांची बैठक आयोजित केली होती.

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, यासाठी कृती समितीच्या लढ्यामध्ये कोल्हापूर चेंबरचा सुरुवातीपासूनच सहभाग होता. प्रलंबित खटले लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेनचे अध्यक्ष राहुल पाटील, कोल्हापूर चेंबरच्या संचालिका जयश्री जाधव, अॅड. इंद्रजित चव्हाण, सीमा जोशी, विज्ञानंद मुंढे यांची भाषणे झाली.

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील म्हणाले, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत यासाठी पाठिंबा दिला. याबद्दल कोल्हापूर चेंबरचे आभार व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर शनिवार 16 रोजी कोल्हापुरात आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

आभार महादेवराव आडगुळे यांनी मानले. यावेळी कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, राजू पाटील, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, संजय पाटील, संपत पाटील, अविनाश नासिपुडे, हॉटेल मालक संघाचे माजी अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, पाणपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत, सोलर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल होनोले, सीमा शहा, डी. डी. पाटील, सीए मंदार धर्माधिकारी, अॅड. रणजित गावडे, अॅड. महेश जाधव, अॅड. मनिषा सातपुते, रणजित पारेख उपस्थित होते.

इचलकरंजीत आतषबाजी

इचलकरंजी : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर झाले. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील मलाबादे चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आतषबाजी करुन साखर-पेढे वाटले. यावेळी आमदार राहुल आवाडे म्हणाले, सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचणार आहे.

न्यायप्रक्रिया गतिमान होईल. या ऐतिहासिक निर्णयासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई, तसेच महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांचे आभार मानतो. भाजपचे श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते, बाळासाहेब माने, पैलवान अमृतमामा भोसले, अॅड. अनिल डाळ्या, प्रसाद खोबरे, प्रमोद बचाटे, अश्विनी कुबडगे, शेखर शहा, सतीश मुळीक, उमाकांत दाभोळे, प्रदीप मळगे, सलीम शिकलगार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#gadhinglaj#Ichalkaranji#lawyer#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaCircuit Bench KolhapurKhandpeeth
Next Article