महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सिप्ला’चा नफा 79 टक्क्यांनी वाढला

06:31 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नफा वाढीसोबत 939 कोटी रुपयांवर :  13 रुपये लाभांश जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

औषध क्षेत्रातील आघाडीची कंपनी सिप्लाने शुक्रवारी मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ज्यामध्ये कंपनीने 939 कोटी रुपयांचा वार्षिक निव्वळ नफा नोंदवला. या निफ्टी 50 कंपनीच्या संचालक मंडळाने मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी समभाग 13 रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे.

सिप्लाचे समभाग निकाल जाहीर झाल्यानंतर घसरले होते. निकालापूर्वी हा शेअर 1395 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होता, पण निकालानंतर शेअर 1320 रुपयांपर्यंत खाली आला होता अशा प्रकारे समभाग तिमाही निकालांना नकारात्मक प्रतिसाद देत आहे.

सदरच्या तिमाहीत ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल रु. 6082 कोटी होता, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. 5,793.3 कोटींच्या तुलनेत 4 टक्के जास्त आहे. निकालापूर्वी, ब्रोकरेज कंपन्यांनी सिप्लाचा महसूल सुमारे 6000 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

ग्लोबल सीईओ उमंग वोहरा काय म्हणाले

मला कंपनीची वार्षिक कामगिरी सांगताना खूप आनंद होत आहे जिथे आम्ही भरीव प्रगती केली आहे, आमच्या महसूलाने आर्थिक वर्ष 24 मध्ये 25,000 रुपये कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर ऑपरेटिंग मार्जिनमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि प्रथमच 6,000 कोटी रुपयाचा टप्पा ओलांडला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article