कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Crime : अंधश्रद्धेच्या नावाने फसवणूक करणारा ‘चुटकीबाबा’ सनी भोसले ठाण्यातून जेरबंद

12:55 PM Nov 24, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                                   ४५ हजारांची फसवणूक करणारा मांत्रिक सनी भोसले अटक

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर गुप्तधन, भूतबाधा दूर करणे, लग्न जुळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणारा चुटकीबाबा सनी रमेश भोसले (वय ३० रा. टिंबर मार्केट, गवत मंडई) याला करवीर पोलिसांनी जेरबंद केले. ठाणे शहर परिसरातील म्हाडा कॉलनीतून रविवारी पहाटेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली.

Advertisement

दरम्यान रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चुकटी बाजवून भूतबाधा, करणी दूर करण्याच्या आमिषाने गणेश काटकर यांची ४५ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी गणेश काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मांत्रिक सनी भोसले याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. करवीर पोलिसांचे एक पथक त्याचा शोध घेत होते. चुटकीबाबा बाई, सातारा परिसरात असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार करवीर पोलिसांच्या एका पथकाने या परिसरात छापा टाकला, मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच त्याने बाई परिसरातून धूम ठोकली होती. तो पुणे किंवा ठाणे परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय तळसकर, सुजय दावणे, रणजित पाटील यांनी रविवारी पहाटे ठाणे शहर परिसरातील म्हाडा बॉलमधून चुटकीबाबाला ताब्यात घेतले. रविवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे करत आहेत.

दुचाकी, चारचाकींची विक्री

सनी भोसले याचा दरबारा क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे गेल्या वर्षभरापासून भरत होता. यामध्ये त्याच्याकडे १००हून अधिक भक्तांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. यातून त्याने बक्कळ पैसा कमावला होता. यावरच तो गेल्या सहा महिन्यापासून आपला उदरनिर्वाह करत होता. सनी भोसले हा पूर्वी दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री करत होता.

कवटी, हाडांचे उत्तर सापडणार

गुन्हा दाखल होताच चुटकीबाबाच्या दरबारावर करवीर पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी कवट्या, हाडे, काळेदोरे असे साहित्य जप्त करण्यात आले होते. सनी भोसले याने या कवट्या आणि हाडे कोठून गोळा केली याची चौकशी होणार आहे.

मे- पासून वाईत, तर १५ दिवसांपासून ठाण्यात

१३ मे २०२५ पासून चुटकीबाबा उर्फ सनी भोसले हा कोल्हापूर सोडून गायब झाला होता. तो बाई आणि सातारा परिसरात एका महिलेसोबत राहत होता. करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच सनी भोसले याने सातारा सोडून ठाणे येथे मुक्काम केला. दरबारामध्ये येणाऱ्या एका भाविकासोबत सनी भोसले याने एक व्यवहार केला होता. यातूनच त्याने ठाणे येथे आश्रय घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaAndhashraddhaChutkibaba arrestKarveer policeKolhapur fraudNirmoolan ActSunny Bhosalesuperstition caseThane arrest
Next Article