क्रिस्टोपर नोलनचा ‘द ऑडिसी’ इतिहास रचणार
ओपेनहायमरला मागे टाकणार
हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनला जगभरात स्वत:च्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाते. मागील वर्षी त्याने ओपेनहायमर चित्रपटाद्वारे इतिहास रचला होता. आता पुन्हा एकदा तो मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहे. नोलनच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. हा चित्रपट ‘द ओडिसी’ असून तो ग्रीक कवी होमर यांचे महाकाव्य ओडिसीवर आधारित आहे.
द ओडिसी या चित्रपटाची निमिर्ती यूनिव्हर्सल पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत केली जाणार आहे. हा चित्रपट आयमॅक्स चित्रपट तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरात चित्रित करण्यात येणार आहे. हा चित्रपट होमर यांच्या मूळ गाथेला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर सादर करणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.
नोलनचा हा चित्रपट 17 जुलै 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट मॅट डेमन, टॉम हॉलंड, जेंडाया मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर ऐनी हॅथवे, रॉबर्ट पॅटिन्सन, लुपिता न्योंगो आणि चार्लीज यासारखे कलाकारही यात सामील आहेत