महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात नाताळ सण उत्साहात साजरा

12:11 PM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्थानिकांबरोबरच पर्यटकांनीही लुटला आनंद : आता सर्वांचे लक्ष नववर्ष स्वागताच्या तयारीकडे

Advertisement

पणजी : गोव्यात सर्वत्र नाताळ सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. त्याची धामधूम आणखी काही दिवस म्हणजे नवीन वर्ष सुरू होईपर्यंत कायम राहाणार आहे. प्रमुख चर्चमध्ये गोठे आणि येशुख्रिस्ताचे जन्मदेखावे तयार करण्यात आले असून ते पाहण्यासाठी पर्यटकही गर्दी करत आहेत.नाताळनिमित्त रविवारी रात्री चर्चमध्ये प्रार्थनासभा झाल्या. सोमवारी दिवसभर ख्रिश्चन बांधवांनी एकामेकाच्या घरी जाऊन तसेच फोनवरुन नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. पारंपरिक गोडधोड पदार्थ खाऊन आनंदोत्सव साजरा केला. विद्युत रोषणाईने ख्रिश्चनांची घरे तसेच चर्च, कपेल्स झगमगून गेल्याचे दिसत आहे. नाताळ झाल्यानंतर आता सर्वांची नजर नवीन वर्षाकडे लागली असून स्वागत कसे करायचे? याचे आराखडे बांधले जात आहेत. नवीन वर्ष स्वागतासाठी विविध कार्यक्रम, पार्टी, नृत्य रजनी यांची आखणी करण्यात आली असून त्यात सामील होण्यासाठी पर्यटकांची पावले गोव्याच्या दिशेने वळत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article