महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाने नाताळचा जल्लोष

12:32 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवीन वर्षापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन : ख्रिसमसच्या खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी,सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी हॉटेल्स झाली फुल्ल

Advertisement

पणजी : गोव्यात नाताळचा धुमधडाका सुऊ झाला असून तो आता नवीन वर्ष 2024 उजाडेपर्यंत चालू राहाणार आहे. तसेच 2024 च्या स्वागतासाठी राज्यात जय्यत तयारी चालू असून विविध कार्यक्रमांनी सज्जता करण्यात येत आहे. रात्री 12 वा. प्रमुख चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव व प्रार्थना कऊन नाताळची सुऊवात झाली तसेच घंटानाद कऊन येशूचे स्वागत करण्यात आले. राज्यात आता सर्वत्र नाताळची लगबग सुऊ झाली असून विद्युत रोषणाई माळा, ख्रिसमस ट्री, सांताचे मुखवटे, टोप्या, रंगीबेरंगी नक्षत्रे यांनी बाजारपेठा सजल्या. त्यांची खरेदी - विक्री मोठ्या प्रमाणात चालू असून ख्रिस्ती बांधवांची घरे उजळून गेली आहेत. लहान मुले, तऊण मंडळी गोठा बनवण्यात मग्न आहेत. अनेक ठिकाणी येशूच्या जन्मावर देखावे तयार करण्याचे काम चालू असून ती पूर्ण झाली आहे. त्यांची पाहणी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. गोवा राज्यात विविध शहरी व ग्रामीण भागात नाताळ सण उत्सवाची धूम बघायला मिळत आहे.

Advertisement

बाजारपेठांमध्ये गर्दी, 10 ते 15 टक्के दरवाढ

नाताळसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून यंदा त्यात 10 ते 15 टक्के दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले. लहान, मोठ्या चर्चची रंगरंगोटी करण्यात आली असून तेथे रोषणाई करण्यात आल्यामुळे चर्च परिसर झगमगून गेला आहे. शिवाय नाताळकरीता लागणारे विविध खाद्यपदार्थ बाजारात विक्रीसाठी आले असून आता तेच खरेदी करण्यावर जनतेचा भर असल्याचे दिसून येत आहे. पुडींग, केक, चॉकलेट, नेवऱ्या असे विविध पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.

पर्यटकांनी हॉटेल्स फुल्ल

नवीन वर्षापर्यंत नाताळची धामधूम सुऊ असते. नाताळला जोडून नवे वर्ष चालू होत असल्याने त्याच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रम गोव्यात आयोजित करण्यात आले आहेत. नवे वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची पावले गोव्याकडे वळत असून ‘सनबर्न’ व त्या सारखी लहान - मोठी नृत्य पार्टी बड्या हॉटेलांमधून आयोजित करण्यात आली आहे. त्यांची तिकीट खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात चालू असून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व अतिमहनिय व्यक्ती यांनी नवे वर्ष साजरा करण्यासाठी गोव्याची निवड केली आहे. ती मंडळी डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे 28 ते 30 तारखेपर्यंत गोव्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांनी गोव्यात येण्याजाण्याचे आरक्षण कऊन ठेवले आहे. राज्यातील बहुतेक हॉटेल्स पर्यटकांनी फुल्ल झाली असून येत्या काही दिवसात आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article