महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चौगुले कंपनीला 1 हजार 75 कोटींना फसविले

06:43 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

गोव्यातील प्रसिद्ध अशा चौगुले समुहाच्या चौगुले अँड कंपनी प्रा. लि. ची 1 हजार 75 कोटींची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीचे अधिकारी हर्ष शहा यांनी गोवा पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कंपनीच्या दोन आर्थिक सल्लागारांसह सहा जणांविऊद्ध भादंसंच्या कलम 420, 477 ए, 120 बी अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांमध्ये विजय चौगुले, रोदीप महात्मे, प्रताप शिर्के यांच्यासह फोर्ट ग्रुप, मारिया पुंचेर व अन्य काहीजणांचा समावेश आहे. चौगुले कंपनीच्या विदेशात चालणाऱ्या ऊद्रा कंपनीने प्रताप शिर्के यांच्या इंग्लंडमधील कंपनीला सुमारे एक हजार कोटींचे कर्ज दिले होते. चौगुलेचे आर्थिक सल्लागार विजय चौगुले आणि रोदीप महात्मे यांनी संचालक मंडळाला तसे निर्देश दिल्यानंतर प्रताप शिर्केंच्या कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते. शिर्के यांच्या शिपिंग कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने दिलेल्या या कर्जाला संचालक मंडळाने मान्यता दिलेली नव्हती. त्यानंतर चौगुले, महात्मे आणि शिर्के यांच्या सांगण्यानुसार शिर्केंच्या कंपन्यांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे कंपनीचे 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. शहा यांच्या तक्रारीची प्राथमिक चौकशी करून तपासकामाला सुऊवात झाली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article