Satara News : चोरे भागात पुन्हा वाढला बिबट्याचा वावर!
साखरवाडी, मस्कर वाडी, भांबे गावात डोंगराळ भागात बिबट्या सक्रिय
चोरे : मध्यंतरी थांबलेली बिबटयाच्या बावराची चर्चा पुन्हा सुरू झाली असून साखरवाडी, मस्करवाडी, भांबे, चोरे, चोरजवाडी या डोंगरालगत असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढलेली डोंगर पायथ्याशी बागायती शेती, वनविभागाच्या हद्दीत बाढलेली झाडी यामुळे बिबटयाला लपायला मुबलक जागा झाली आहे. वडगाव हद्दीपासून दुसाळे गावापर्यंत पूर्व पश्चिम अशी सुमारे तेरा ते चौदा किलोमीटर डोंगर रांग आहे. या डोंगरात दाट झाडीने बिबट्यालाभरपूर जागा मिळत आहे.
चोरजवाडी व चोरे येथील लहान मोठ्या तलावात पाणी आहे. लहान मोठे जंगली प्राणी हे बिबट्याचे खाद्य या वनविभागाच्या हद्दीत मिळत आहे. गर्द व दाट झाडी असल्याने नागरिकांचा कमी बाबर या भागात आहे. डोंगराच्या जवळ बिबट्याच्या भीतीने एकटे कोणीही जनावरे घेऊन जात नाहीत.मागील आठवड्यात भांबे, चोरजवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला झाडीतून बिबट्या बाहेर पडलेला दिसला. भीतीपोटी शेतकरी दुर्गम भागात शेडवर जनावरांना पाणी देण्यासाठी सुद्धा जाण्यास भीत आहेत.