For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शोकभूमी’ अशी ओळख असलेले चोकाहातू

06:50 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘शोकभूमी’ अशी ओळख असलेले चोकाहातू
Advertisement

झारखंडच्या रांचीनजीक चकित करणारे ठिकाण

Advertisement

झारखंडची राजधानी रांचीच्या सोनाहातूनजीक चोकाहातू नावाचे ठिकाण आहे. चोकाहातूचा स्थानिक भाषेतील अर्थ ‘शोकाची भूमी’ असा होतो. येथे भारताची सर्वात मोठी मेगालिथिक साइट मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. मेगालिथिक साइट आणि स्ट्रक्चर म्हणजे हजारो वर्षे जुनी दफनभूमी किंवा मकबरा असा अर्थ होतो. हा भाग सुमारे 7 एकरमध्ये फैलावलेला आहे. जियोलॉजिस्ट डॉ. नीतेश प्रियदर्शी यांच्यानुसार हे स्थळ 2500 वर्षे जुने आहे.

याच्या नावातून प्राचीन काळात येथे मृतदेह दफन करण्याची परंपरा राहिली असावी हे स्पष्ट होते. याचा पुरावा येथील एका मोठ्या भूभागात मेगालिथिक स्ट्रक्चर आहे. या ठिकाणाविषयी अधिक माहिती जमविण्याचा प्रयत्न सुरू केला असता हे ठिकाण मुंडा लोकांची प्राचीन ससनदिरी असल्याचे कळले. चोकाहातूचे हे स्थळ सुमारे 2500 वषे जुने मुंडा यांचे हडगडी (मृतदेह दफन करण्याची प्रक्रिया) स्थळ आहे. मुंडा हजारो वर्षांपासून येथे पूर्वजांना दफन करत आल्याचे बोलले जाते. मेगालिथलाच मुंडारी भाषेत ससनदिरी म्हटले जाते अशी माहिती नितीश प्रियदर्शी यांनी दिली.

Advertisement

1873 मध्ये लेख

कर्नल ई.टी. डाल्टन यांनी 1873 मध्ये या मेगालिथिक साइटवर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमध्ये एक लेख लिहिला होता. स्वत:च्या या लेखात चोकाहातू मेगालिथिक साइटचे क्षेत्रफळ त्यांनी सुमारे 7 एकर असल्याचे नमूद केले होते. तसेच यात 7300 दगड गाडलेले असल्याचे म्हटले गेले होते. झारखंडमध्ये इतक्या विस्तृत क्षेत्रात मेगालिथिक साइट कुठेच नाही.

ग्रेनाइट, डोलमेन दगडांनी निर्मित मेगालिथ्स

भारताची सर्वात मोठी ससनदिरी म्हणजे मेगालिथपैकी हे एक असल्याचे मानले गेले आडहे. रांचीच्या पिस्का मोडमध्ये देखील अत्यंत मोठे मेगालिथ आहे. चोकाहातूमध्ये जे दगड रचण्यात आले आहेत, ते बहुतांश करून ग्रेनाइट नीस आणि ग्रेनाइटचे आहेत. येथे सर्व मृतांच्या स्मारकावर दगड आहेत. हे चोकोनी आणि टेबलवजा आकाराचे आहेत. येथे आजही मुंडा लोक मृतांना दफन करतात किंवा मृतांच्या ‘हडगडी’ची प्रक्रिया पार पाडतात.

जागतिक वारसास्थळ घोषित करा

संशोधनानुसार हे मुंडा समुदायाच्या सांडिल गोत्राचे हडगडी स्थळ आहे. ही ससनदिरी कमीतकमी तीन हजार वर्षांपासून मुंडा आदिवासी समुदायाच्या जिवंत परंपरेचा हिस्सा आहे. चोकाहातूच्या मेगालिथ साइटला जागतिक वारसास्थळ घोषित करण्याची मागणी संशोधक करत असले तरीही स्थानिक लोकांना याच्या महत्त्वाची कल्पना नाही.

काय असते मेगालिथिक साइट?

मेगालिथिकला एक प्रकारे पाषाणकाळातील लोकांचा मकबरा म्हटले जाऊ शकते. मेगालिथिक मोठमोठ्या दगडांनी निर्मित संरचना असतात, युरोपमध्ये अनेक ठिकाणी अत्यंत विशाल आकाराचे मेगालिथिक देखील आहेत. या संरचना आजवर वैज्ञानिक आणि पुरातत्व तज्ञांसाठी रहस्यच आहेत. कारण मोठमोठ्या दगडांना परस्परांवर ठेवून या संरचना निर्माण करण्यात आल्या आहेत. हजारो वर्षापूर्वी हे करणे कसे शक्य झाले हा प्रश्न उपस्थित होतो.

Advertisement
Tags :

.