chittahproject;पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले
chittahproject- देशातील संस्थान बरखास्त झाल्यानंतर चित्ता नामशेष झाला. त्यानंतर सत्तर वर्षांनंतर भारतात पुन्हा एकदा चित्ते अवतरले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये ५ मादी आणि ३ नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले . त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडण्यात आले.
अधिक वाचा- एकेकाळी कोल्हापुरात होता चित्त्यांचा हब, सहज पाळले जायचे चित्ते
कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे ७४८ चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येईल.