कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उचगावात शिवरायांच्या जयघोषात चित्ररथ मिरवणूक

11:07 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पारंपरिक वाद्यांच्या गजरासह देखावे

Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

उचगाव येथे मंगळवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष,काही मंडळाच्यावतीने पारंपरिक वाद्यांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे तर काही मंडळांकडून यावर्षीही डॉल्बीच्या गोंगाटात आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साही वातावरणात पार पडली. रात्री आठ वाजता मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून उचगावमधील सहा चित्ररथ मिरवणुकीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी नागेशनगर, मठ गल्ली, अनगोळ गल्ली, लक्ष्मी गल्ली, मरगाई गल्ली अशा अनेक गल्ल्यातील युवक मंडळांनी वेगवेगळ्या देखाव्यांसह चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराकडून गणपत गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कचेरी गल्ली सह सुरवीर गल्ली मार्गे मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली मार्गे फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर नाचणारी युवा पिढी यामुळे गाव डॉल्बीच्या गोंगाटातच यंदाही हरवल्याचे दिसून आले.

शिवशाहीर देवगेकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम

येथील संयुक्त एमजी तालीम मंडळ मारुती गल्ली उचगाव यांच्या विद्यमाने खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवशाहीर वेंकटेश देवगेकर यांचा बहारदार पोवाड्यांचा कार्यक्रम झाला.पृथ्वीराज नवार यांनी स्वागत केले. तर प्रफुल चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मुकुंद नवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी साई पावशे, मिथिल जाधव, सचिन कदम, विशाल कोवाडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला सिद्राय लाळगे, गजानन चौगुले, गुंडू लोहार आणि नागनाथ मुतगेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी शिवशाहीर वेंकटेश देवगेकर यांनी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून शाहिराची कामगिरी सादर केली असून झी मराठी, स्टार प्रवाह यावर त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. उचगावमध्ये 101 वा हा कार्यक्रम त्यांनी यावेळी सादर करून प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अनेक प्रसंग सांगणारे पोवाडे त्यांनी सादर केले. यावेळी लहान कलाकारही पोवाडा कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article