‘वॉर ड्रामा’मध्ये चित्रांगदा सिंह
सलमान खान मुख्य भूमिकेत
अपूर्व लखिया पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर युद्धकथा घेऊन येत आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिका साकारणार आहे. तर आता यातील नायिकेचे नाव समोर आले आहे. सलमान खान पहिल्यांदाच एखाद्या सैन्याधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.
या चित्रपटात चित्रांगदा सिंह ही नायिका असणार आहे. सलमानपेक्षा 10 वर्षांनी लहान असणाऱ्या चित्रांगदासाठी ही मोठी संधी असणार आहे. चित्रांगदाने 2005 साली ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर तिला खरी ओळख ‘देसी बॉयज’ या चित्रपटाद्वारे प्राप्त झाली होती. अलिकडेच तिने अक्षय कुमारसोबत ‘हाउसफुल 5’ या चित्रपटात काम केले आहे.
अपूर्व लखियाचा आगामी चित्रपट गलवान खोऱ्यातील चीनसोबतच्या संघर्षावर आधारित असणार आहे. या चित्रपटात सलमान खान हा हुतात्मा कर्नल संतोषबाबू यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.