For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘खाकी : द बंगाल चॅप्टर’मध्ये चित्रांगदा

06:08 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘खाकी   द बंगाल चॅप्टर’मध्ये  चित्रांगदा
Advertisement

अभिनेत्री चित्रांगदा सिंह अलिकडेच एका चित्रपटातील गाण्यात दिसून आली होती. आता चित्रांगदा लवकरच वेबसीरिज ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’मध्ये काम करणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती नीरज पांडे करणार आहे. खाकी : द चॅप्टर ही सीरिज ‘खाकी : द बिहार चॅप्टर’चा पुढील भाग असेल. पहिला सीझन 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात निकिता दत्ता, अविनाश तिवारी, आशुतोष राणा, ऐश्वर्या सुष्मिता समवेत अनेक कलाकार दिसून आले हेते.

Advertisement

नीरज पांडे यांच्या वेबसीरिजसाठी मी अत्यंत उत्सुक आहे. सध्या याचे चित्रिकरण सुरू आहे. लवकरच मी आणखी एका चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर एका प्रोजेक्टसाठी चर्चा सुरू असल्याचे चित्रांगदाने सांगितले आहे.

चित्रांगदा यापूर्वी ‘गॅसलाइट’ चित्रपटात दिसून आली होती. यात विक्रांत मैसी आणि सारा अली खान यांनीही काम केले होते. चित्रांगदाने यापूर्वी बॉब बिस्वास, आय मी और मैं, ये साली जिंदगी, हजारो ख्वाहिशें ऐसी, इंकार, साहेब बीबी और गँगस्टर 3 आणि बाजार समवेत काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.