महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हॉकी स्पर्धेत चिटणीस, एसकेई कन्नडा संघ विजेते

10:13 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्लेजेंट कॉनव्हेंट, एसकेई उपविजेते

Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व एसकेई कन्नड स्कुल आयोजित छ. शिजाजी क्लस्टर शहापूर, अनगोळ, टिळकवाडी विभागाच्या प्राथमिक विभागीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलांच्या गटात एसकेई कन्नड संघाने प्लेजेंट कॉनव्हेंट संघाचा तर जी. जी. चिटणीस संघाने एसकेई कन्नडा संघाचा पराभव करुन विजेतेपद मिळवित तालुका स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्लेजेंट कॉनव्हेंट स्कूलचे अध्यक्ष यशोधर जैन, निवृत्त मेजर उत्तम शिंदे, सुधाकर चाळके, स्पर्धा सचिव प्रवीण पाटील आदींच्या हस्ते खेळाडूंची ओळख करुन झाले. पहिल्या अंतिम सामन्यात मुलांच्या गटात एसकेई कन्नडा  संघाने प्लेजेंट कॉनव्हेंट संघाचा 3-0 असा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात दहाव्या मिनीटाला श्रवणच्या पासवरती प्रेम सुतारने पहिला गोल केला.

Advertisement

20 व्या मिनीटाला प्रेमच्या पासवर श्रवणने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनीटाला राकेशच्या पासवरती प्रेम सुतारने तिसरा गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेत नवख्या प्लेजेंट संघला गोल करण्यात अपशय आले. मुलींच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या जी. जी. चिटणीस संघाने एसकेई कन्नडा संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 17 व 23 व्या मिनीटाला चिटणीसच्या सचिता पाटीलच्या पासवर सायली पाटीलने सलग दोन गोल करुन पहिल्या सत्रात 2-0ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 31 व्या मिनीटाला सायलीच्या पासवरील सचिता पाटीलने तिसरा गोल करुन 3-0ची आघाडी संघाला मिळवून दिली. या सामन्यात एसकेई संघाला गोल करण्यात अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सुधाकर चळके, उत्तक शिंदे, प्रवीण पाटील, धनसिंग धनाजी, आर. बी. परीट, संतोष दळवी आदी मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article