महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा हॉकी स्पर्धेत चिटणीस स्कूल विजेता

10:51 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे चंद्रगी स्पोर्ट्स स्कूल चंदरगी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये जी जी चिटणीस शाळेच्या प्राथमिक मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवले तर माध्यमिक संघाला उपवितेपदावर समाधान मानावे लागले. प्राथमिक मुलींच्या अंतिम सामन्यांमध्ये जी जी चिटणीस शाळेच्या हॉकी संघाने सेंट जोन्स काकती संघाचा 2-0 असा गोल फरकाने पराभव करून विजेतेपद मिळविले.  जीजी चिटणीस संघातर्फे महेक बिस्तीने 2 गोल नोंदविले. आता हा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. चिटणीस प्राथमिक मुलींच्या संघात संचिता पाटील, तनुश्री भवानी, श्रेया बनकर, सायली पाटील, सेजल नंद्याळकर, सेजल पाटील, अमृता नंदगडकर, पद्मश्री सुतार, अस्मिता कामत, आरुषी बसुर्तेकर, महेक बिस्ती, तनिष्का असलकर, वैभवी राजमाने, अतिथी शेट्टी यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. माध्यमिक मुलींच्या गटामध्ये चिटणीसच्या हॉकी संघाने द्वितीय स्थान पटकावले.माध्यमिक मुलींच्या अंतिम सामन्यांमध्ये ताराराणी खानापूरकडून टायब्रेकरमध्ये 1-0 पराभव स्वीकारला. उपविजेत्या जीजी चिटणीस संघात वैष्णवी इटनाळ, श्रेया गोलीहली, सेजल भावी, निशा दोड्डमनी, राघवी गुंडपण्णावर, वैष्णवी नायक, भूमी लटकन, तनुश्री गावडे आदींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. दोन्ही संघाला क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी यांचे मार्गदर्शन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. नवीन शेट्टीगार, अॅड. चंद्रहास अनवेकर व शिक्षक वर्ग यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article