महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चिटणीस, मेरीज, डीपीएम, हेरवाडकर, एमव्हीएन विजयी

10:06 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

56 वी फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा 

Advertisement

बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाइडतर्फे सेंट पॉल्स हायस्कूलच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृतीचषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांतून जी. जी. चिटणीस, सेंट मेरीज, ज्ञान प्रबोधन मंदिर, एम. व्ही. हेरवाडकर, मराठी विद्यानिकेतन संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला आहे. सेंटपॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जी. जी. चिटणीस संघाने ज्ञान मंदिर संघाचा 8-0 असा पराभव केला. आदित्य जोशीलकर व अंगद लोकम यांनी प्रत्येकी 3, शौर्य कंग्राळकर, मंजुनाथ जतनी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात सेंट मेरीज संघाने पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या 17 व 48 व्या मिनीटाला ग्रंथ पाटीलने सलग दोन गोल करुन 2-0 ची आघाडी सेंट मेरीज संघाला मिळवून दिली. या सामन्यात पोतदार संघाला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या सामन्यात ज्ञान प्रबोधन मंदिर संघाने मदनी संघाचा 3-1 असा पराभव केला.

Advertisement

दहाव्या मिनीटाला अमित हंगिरगेकरने पहिला गोल केला तर 18 व्या मिनीटाला तन्मय पाटीलने दुसरा तर विकास गायप्पान्नवरने 30 व्या मिनीटाला गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली. मदनीतर्फे अहमद जकातीने 32 व्या मिनीटाला गोल करुन 1-3 अशी आघाडी कमी केली. चौथ्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने ज्योती सेंट्रल संघाचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात हेरवाडकरतर्फे शौर्य घोणेने 7 व 9 व्या मिनीटाला सलग दोन गोल करुन 2-0ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 36 व्या मिनीटाला ऋषक बलालने तिसरा गोल करुन 3-0ची आघाडी मिळवून दिले. तर 39 मिनीटाला ज्योती सेंट्रलच्या आदित्य ओऊळकरने गोल करुन 1-3 अशी आघाडी कमी केली. पाचव्या सामन्यात मराठी विद्यानिकेतनने भरतेश संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 31 व्या मिनीटाला गौतम हुंदरेने गोल करुन 1-0 ची आघाडी विद्यानिकेतनलामिळवून दिली. त्यानंतर भरतेशने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article