For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत चिनी वैज्ञानिक दोषी

07:00 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत चिनी वैज्ञानिक दोषी
Advertisement

शिक्षा पूर्ण झाल्याने चीनमध्ये परत पाठविले जाणार

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

अमेरिकेच्या मिशिगनमध्ये जैविक सामग्रीच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चिनी वैज्ञानिकाने न्यायालयात स्वत:चा गुन्हा मान्य केला. वैज्ञानिकाने यापूर्वी तुरुंगात काढलेल्या 5 महिन्यांच्या कालावधीला शिक्षा मानण्यात आले आहे. आता या वैज्ञानिकाला मुक्त करत चीनमध्ये परत पाठविले जाणार आहे. 33 वर्षीय यूनकिंग जियान ही युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या एका प्रयोगशाळेत अस्थायी संशोधिका म्हणून कार्यरत होती, तिला जून 2024 मध्ये अटक करण्यात आली होती. स्वत:चा प्रियकर जुनयोंग लियूसोबत मिळून अमेरिकेत धोकादायक फंगस आणण्याचा कट तिने रचला होता. हा फंगस फ्यूजेरियम ग्रामिनेरम नावाचा एक रोगजनक असून तो गहू, मक्का आणि भातपिकावर आक्रमण करत त्यांना नष्ट करू शकतो.

Advertisement

हा फंगस अमेरिकेच्या काही भागांमध्ये हवामान आणि पिकाच्या स्थितींवर निर्भर राहून पूर्वीपासूनच अस्तित्वात होता. परंतु या फंगसला विदेशातून विना अनुमती आणणे गुन्हा आहे. याप्रकरणी सरकारी वकिलाने यूनकिंगला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्याची मागणी केली होती, तर न्यायाधीशांनी केवळ 5 महिन्यांची शिक्षा सुनावली. जियान यांनी 5 महिन्यांची शिक्षा यापूर्वीच तुरुंगात राहून पूर्ण केली आहे. यूनकिंगने न्यायालयाची माफी मागितली आहे. संशोधनाला पुढे नेण्याचा आणि परिणाम दाखवून देण्याचा दबाव माझ्यावर होता, याचमुळे मी नियमांचे पालन केले नव्हते. माझा उद्देश कुणाला नुकसान पोहोचविणे नव्हता, तर पिकांना आजारांपासून वाचविण्याच्या पद्धतींवर काम करणे होता, असा दावा यूनकिंगने न्यायालयासमोर केला.

Advertisement
Tags :

.