For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिनी सैन्याचा फिलिपाईन्सच्या सैनिकांवर चाकू-कुऱ्हाडीने हल्ला

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिनी सैन्याचा फिलिपाईन्सच्या सैनिकांवर चाकू कुऱ्हाडीने हल्ला
Advertisement

मनिला : चिनी सैनिकांनी शेजारी देश फिलिपाईन्सच्या नौदलावर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ले करत लूट केली आहे. फिलिपाईन्सच्या सैन्याने चिनी सैनिकांचे हे कृत्य दर्शविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. फिलिपाईन्सच्या अधिकाऱ्यांनी चीनला फटकारत हा प्रकार सागरी लुटीचा असल्याचे म्हटले आहे. चिनी तटरक्षक दलाकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रास्त्रs तसेच उपकरणे परत केली जावीत तसेच हल्ल्यात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यात यावी अशी मागणी फिलिपाईन्सच्या सैन्यप्रमुखांनी केली आहे. या हल्ल्याची तुलना त्यांनी सागरी चाचेगिरीशी केली आहे. आठहून अधिक मोटरबोटवर सवार चिनी सैनिकांनी फिलिपाईन्स नौदलाच्या नौकांना वारंवार धडक देत त्यांना रोखले. चिनी सैनिकांनी या नौका जप्त करत फिलिपाईन्सच्या नौसैनिकांवर हल्ला केला. चिनी सैनिकांनी  अनेक उपकरणे, 8 एम4 रायफल्स देखील लुटली आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.