चीनची झेन, मारिया उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ क्वीन्स क्लब
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या महिलांच्या क्वीन्स क्लब चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेत चीनची टॉप सिडेड झेंग क्वीनवेन आणि 37 वर्षीय जर्मिनीच्या मारियाने एकेरीची उपांत्य फेरी गाठली. मात्र इमा राडूकेनू आणि रायबाकीना यांचे आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झेंग क्वीनवेनने इमा राडूकेनूचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली. त्याचप्रमाणे जर्मनीच्या 37 वर्षीय मारियाने इलेना रायबाकिनाचा 6-4, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. रायबाकिनाने 2022 साली विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. जर्मनीची मारिया आणि अमेरिकेची मॅडिसन किज यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. मॅडिसन किजने डायना स्नायडेरचा 2-6, 6-3, 6-4 असा पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले.