चीनचा सर्वात अद्भूत एक्स्प्रेसवे ‘स्काय रोड’ असे टोपण नाव
चीनचा ‘याक्सी एक्स्प्रेसवे’ अत्यंत लोकप्रिय आहे. हा सर्वात अदभूत एक्स्प्रेसवे आहे. या एक्स्प्रेसवेची लांबी 240 किलोमीटर इतकी असून जिनावजा हा एक्स्प्रेसवे दक्षिणपश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतात जिचांगला याआनला जोडतो. याला जिनावजा स्काय रोड’ या नावानेही ओळखले जाते. याची रचना पाहून दंग व्हायला होते. आता याच्याशी निगडित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत हा एक्स्प्रेसवे दिसून येतो. दुर्गम पर्वतांवर तयार करण्यात आलेल्या एक्स्प्रेसवेची रचना थक्क करणारी आहे. हा 270 वायाडक्ट्स आणि 25 भुयारांनी तयार झालेला एक्स्प्रेसवे आहे. हा एक्स्प्रेसवे समुद्रसपाटीपासून 600 मीटर ते 3200 मीटरपर्यंत उंच आहे. याला ‘ढगांमधील एक्स्प्रेसवे’ असेही म्हटले जाते. कारण रस्ता प्रत्येक किलोमीटरनंतर 7.5 मीटर अधिक उंचीवर तयार करण्यात आलेला आहे.
हा एक्स्प्रेसवे सिचुआनमध्sय जी5 जिंगकुन (बीजिंग ते कुनमिंग) महामार्गाचा हिस्सा आहे. हा महामार्ग सिचुआनपासून सुरू होत हेंगडुआन पर्वतापर्यंत तयार करण्यात आला आहे. एक्स्प्रेसवे किंग्यी, दादू आणि एनिंग नद्यांवरून गेला आहे.
याक्सी एक्स्प्रेसवेवर गन्हाजी ब्रिज देखील असून त्याची निर्मिती एक चमत्कारच मानला जातो. हा शिमियान काउंटी, याआन, सिचुआनमध्ये 2500 मीटरच्या उंचीवर आहे. याची एकूण लांबी 1811 मीटर आणि पुलाची रुंदी 24.5 मीटर इतकी असून यात एकूण 36 स्पॅन आहे. हा जगातील पहिला रिनफोर्स्ड काँक्रिट ट्रस ब्रिज आहे.
हा एक्स्प्रेसवे वर्षभर खुला असतो, याची निमिर्ती 2007 मध्ये सुरू करण्यात आली होती. 6 वर्षांपेक्षा कमी कालावधीत याची निमिर्ती पूर्ण करण्यात आली आहे. 2012 मध्ये याचे उद्घाटन करण्यात आले होते. याच्या निर्मितीकरता 20.6 अब्ज युआन म्हणजेच सुमारे 3.3 अब्ज डॉलर्स इतका खर्च आला आहे.