चीनची निर्यात जूनमध्ये वाढली
नवी दिल्ली :
चीनची निर्यात जूनमध्ये वार्षिक 8.6 टक्क्यांनी वाढून 307.8 अब्ज डॉलरची झाली आहे. ही अंदाजे 7.4 ते आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ आहे. चीनच्या सीमाशुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये आयातीत घट झाली आहे. आयात 208.8 अब्ज डॉलरची होती. जी वर्षभरात 2.3 टक्क्यांनी घसरली आहे.
जूनमधील मजबूत निर्यातीमुळे मे महिन्यातील 82.6 अब्ज डॉलरवरून चीनचा व्यापार अधिशेष 99 अब्ज डॉलर झाला. अमेरिका आणि युरोपसोबतच्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीत ही वाढ नोंदवली. अमेरिका आणि युरोपने चिनी बनावटीच्या इलेक्ट्रिक कारवर शुल्क वाढवले आहे. कॅपिटल इकॉनॉमिक्सचे जिचुन हुआंग म्हणाले की, यूएस आणि युरोपियन युनियनने लादलेल्या शुल्काचा अल्पावधीत एकूण निर्यातीवर फारसा परिणाम होणार नाही. याचा परिणाम चिनी निर्यातीच्या केवळ एका छोट्या भागावर होईल असे ते म्हणाले.