For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीन महिला संघ उबेर चषकाचा मानकरी

06:35 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
चीन महिला संघ उबेर चषकाचा मानकरी
Advertisement

वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या रविवारी येथे झालेल्या उबेर चषक महिलांच्या सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत यजमान चीनने इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत जेतेपद पटकाविले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चीनने आतापर्यंत 16 वेळेला उबेर चषकावर आपले नाव कोरले आहे.

2016 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा चीनमध्ये यावेळी घेतली गेली. यजमान चीनच्या महिला संघाला फेवरीट म्हणून सुरुवातीपासून ओळखले गेले. या स्पर्धेत गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत बलाढ्या दक्षिण कोरीयाकडून चीनला अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती. रविवारी येथे झालेल्या चीन आणि इंडोनेशिया यांच्यातील अंतिम लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मॅरिस्का टूनजुंगचा 21-7, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. चीनच्या युफेईने या स्पर्धेत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकही गेम गमावलेला नाही. दुहेरीच्या सामन्यात चीनच्या टॉप सिडेड चेन क्विंगचेन आणि जिया इफेन यांनी इंडोनेशियाच्या सीटी फेडीया सिल्वा रमाधंती व रिबीका सुगीयार्तो यांचा 21-11, 21-8 अशा गेम्समध्ये पराभव केला. या विजयामुळे चीनने इंडोनेशियावर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात चीनच्या बिंगजाओने इंडोनेशियाच्या इस्टेर ट्री हिचा 21-15, 21-17 असा पराभव करत इंडोनेशियाचे या लढतीतील आव्हान संपुष्टात आणले. चीनने या लढतीतील सलग 3 सामने जिंकल्याने उर्वरित 2 सामने औपचारीक असल्याने ते खेळविले गेले नाहीत. उबेर चषक स्पर्धेत जपान आणि कोरिया यांना कांस्यपदके देण्यात आली. तर थॉमस चषकासाठी अंतिम लढत रविवारी उशिरा येथे होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.