For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीन थॉमस-उबेर चषकाचा मानकरी

06:25 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
चीन थॉमस उबेर चषकाचा मानकरी
Advertisement

थॉमस व उबेर चषक जिंकणारे चीनचे पुरुष व महिला संघ.

Advertisement

वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थॉमस आणि उबेर चषक सांघिक पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यजमान चीनने आपले निर्विवाद वर्चस्व राखले. चीनच्या बॅडमिंटनपटूंनी थॉमस आणि उबेर चषकावर आपले नाव कोरत दुहेरी मुकुट साधला.

Advertisement

पुरुषांच्या विभागात ठेवण्यात आलेल्या थॉमस चषकासाठीच्या अंतिम सामन्यात चीनने इंडोनेशियाचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. चीनने या स्पर्धेच्या इतिहासात अकराव्यांदा थॉमस चषक पटकाविला आहे. 2018 साली झालेल्या स्पर्धेत चीनने जपानचा पराभव करत विजेतेपद मिळविले होते. इंडोनेशियाने आतापर्यंत चौदा वेळेला थॉमस चषक जिंकला होता. पण त्यांना या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. दोन वर्षापूर्वी बँकॉकमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने इंडोनेशियाचा पराभव करत विजेतेपद मिळविले होते.

महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या उबेर चषक सांघिक स्पर्धेत चीनने अंतिम सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी फडशा पाडला. चीनने सोळाव्यांदा उबेर चषकावर आपले नाव कोरले आहे. चीनच्या बिंगझाओने इंडोनेशियाच्या ईस्टर वेर्दायोचा तीन गेम्समधील लढतीत पराभव केला. दोन वर्षापूर्वी थायलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत चीनला अंतिम लढतीत दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला होता. उबेर चषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये चीन नंतर सर्वात यशस्वी ठरणारा जपान हा दुसरा देश आहे. जपानच्या महिला बॅडमिंटनपटूंनी आतापर्यंत सहा वेळेला उबेर चषक जिंकला आहे.

पुरूषांच्या अंतिम लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात चीनच्या द्वितीय मानांकित शी युक्विने सातव्या मानांकित इंडोनेशियाच्या अँथोनी जिनटिंगचा सरळ गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर या अंतिम लढतीत दुहेरीचा पहिला सामना कलाटनी देणारा ठरला. चीनच्या लियांग विकेंग आणि वेंग चेंग या जोडीने इंडोनेशियाच्या फझर अल्फियान आणि मोहम्मद रियान आर्देंतो यांचा तीन गेम्समधील लढतीत पराभव केला. त्यानंतर इंडोनेशियाच्या जोनातेन ख्रिस्टीने चीनच्या लि शिफींगचा एकेरीच्या सामन्यात पराभव करुन आपल्या संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण त्यानंतर दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात चीनच्या जिटींग आणि जियानगेयु या चीनच्या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव करत थॉमस चषकावर नाव कोरले.

महिलांच्या अंतिम लढतीत चीनच्या चेन युफेईने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया तुनजुंगचा एकेरीच्या सामन्यात पराभव केला. त्यानंतर चीनच्या चेन क्विंगचेन आणि जिया इफेन यांनी दुहेरीच्या सामन्यात विजय मिळवित आपल्या संघाची आघाडी वाढविली. दुसऱ्या एकेरी सामन्यात चीनच्या बिंगजाओने विजय मिळवित इंडोनेशियाचे आव्हान संपुष्टात आणले. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या सांघिक बॅडमिंटन मानांकनात चीनने पुन्हा अग्रस्थान काबिज केले आहे.

Advertisement
Tags :

.