For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतासोबत काम करण्यास चीन तयार!

06:14 AM Dec 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतासोबत काम करण्यास चीन तयार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारत आणि चीन उच्चस्तरीय चर्चेच्या माध्यमातून आपले संबंध सुधारण्याच्या दिशेने काम करत आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चेची 23 वी फेरी झाली. दोघांमधील भेटीदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) शांतता व स्थिरता राखणे आणि चार वर्षांहून अधिक काळ रखडलेले द्विपक्षीय संबंध पूर्ववत करणे यासह अनेक मुद्यांवर चर्चा झाली.

चीन दौऱ्यावर असलेले एनएसए अजित डोवाल यांनी बुधवार 18 ऑक्टोबर रोजी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची बीजिंगमध्ये भेट घेतली. भारतीय वेळेनुसार सकाळी आठ वाजता दोघांची भेट सुरू झाली. या बैठकीनंतर चीनने भारतासोबत केलेल्या करारांची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. चीन प्रामाणिकपणे मतभेद सोडवण्यास तयार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सांगितले.

Advertisement

भारत आणि चीन यांच्यातील 23 व्या विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठकीत सहभागी होण्यासाठी डोवाल 17 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये दाखल झाले होते. डोवाल यांच्यासह भारतीय शिष्टमंडळही उपस्थित होते. भारत आणि चीनमध्ये या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीमा विवाद सोडवण्यासाठी एक करार झाला होता. यासाठी दोन्ही देशांनी अजित डोवाल आणि वांग यी यांना विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. 2019 नंतर भारतीय वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी चीनमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2019 मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर बीजिंगला गेले होते.

भारत-चीनमध्ये 2 वर्षांत 38 बैठका

पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये चार वर्षांपासून तणाव होता. दोन वर्षांच्या वाटाघाटीनंतर, 21 ऑक्टोबर रोजी दोन्ही सैन्याने वादग्रस्त बिंदू डेपसांग आणि डेमचोकमधून माघार घेण्याचा करार झाला. यानंतर 25 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांच्या सैन्याने वादग्रस्त ठिकाणांवरून माघार घ्यायला सुरुवात केली.

‘एलएसी’वर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी सैन्य मागे घेणे ही पहिली पायरी असल्याचे सांगितले होते. पुढील टप्प्यात तणाव कमी करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तणाव कमी करण्यासाठी दोन वर्षांत 38 बैठका झाल्या. करारानुसार, दोन्ही लष्कर एप्रिल 2020 पासून त्यांच्या पूर्वीच्या स्थितीत परतले आहेत. एप्रिल 2020 पूर्वी सैन्य ज्या भागात गस्त घालत होते त्याच भागात आता सैन्य गस्त घालत आहेत.

Advertisement
Tags :

.