चीनकडून ‘मून केक’ची निर्मिती
केवळ चंद्रावरच खाऊ शकतात लोक
मिड-ऑटम फेस्टिव्हलच्या पौर्णिमेच्या दिनी चीनच्या अंतराळवीरांना अंतराळात अनोखा जल्लोष केला. शेंझोऊ-20 मिशनच्या चेन डोंग, चेन झोंग्रुई आणि वांगजी यांनी तियांगोंग अंतराळ स्थानकावर ग्राउंड टीमकडून स्पेशल पॅक करण्यात आलेल्या मून केकची चव चाखली आहे. हा मून केक रेड बीन पेस्ट फिलिंगयुक्त होता, जो शून्य गुरुत्वाकर्षणात हवेत झेपावत खाण्यात आला. अंतराळवीरांना मून केक कापताना आणि फ्लोटिंग पीस पकडतानाचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
अंतराळवीरांना अंतराळातही उत्सव साजरा करता यावा म्हणून हा मून केक तयार करण्यात आला आहे. हा अंतराळाचा स्वत:चा मून केक असून तो केवळ चंद्राच्या उंचीवरच चाखला जाऊ शकतो, असे चेन डोंग यांनी सांगितले आहे. ग्राउंड सपोर्ट टीमने पर्सनलाइज्ड फूड
पॅकेज तयार केले होते, ज्यात मून केकसोबत व्हेजिटेबल डिश म्हणजेच व्हाइट किंग ऑयस्टर मशरुम्स, ब्रेज्ड बान्स शूट्स, गोल्डन रोल्स, मशरुम विथ मिंस्ड पोर्क, श्रिंप बॉल्स विथ वॉटर चेस्टनट्स, राइस नूडल्स, स्पेस जोंगजी आणि स्वीट ऑस्मंथस चीज राइस केक सामील होता. मीट डिशेजमध्ये ब्रेज्ड पोर्क, माइल्डली स्पाइसी लँब, ब्लॅक पेपर फिलेट आणि एट-ट्रेजर चिकन सर्व करण्यात आले.
सर्व खाद्यपदार्थांची चव घरासारखी होती आणि प्रमाणही मोठे होते, असे वांग यांनी म्हटले आहे. यात सर्वात खास होता मून केक जो अंतराळासाठी विशेष स्वरुपात डिझाइन करण्यात आला आहे. सामान्य मून केक क्रंबली असतात, परंतु स्पेस वर्जन सॉफ्ट, नॉन-क्रंबली आणि न्यूट्रिशन रिच आहे. रेड बीन पेस्ट फिलिंग हेल्थी, व्हिटॅमिनने युक्त असतात. ग्राउंड टीमने अंतराळवीरांच्या आवडीनुसार तो पॅक केला होता.