महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केचअप पाहून ओरडू लागते युवती

06:17 AM Mar 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गंध येताच होतात अश्रू अनावर

Advertisement

माणसाला अनेक प्रकारचे आजार होत असतात, यातील काही आजारांबद्दल सर्वसामान्यांना माहिती देखील नसते. काही आजारांचे चाचण्यांद्वारे निदान करता येते. तर मानसिक समस्यांचे निदान केवळ अनुभवाद्वारेच होऊ शकते. अशाच प्रकारचा एक आजार आहे फोबिया, म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल मनात भीती तयार होणे आहे. ही भीती अनेकदा अशा अजब गोष्टींमुळे निर्माण होत असते, ज्याची आम्ही कल्पना देखील करू शकत नाही. एका युवतीला टोमॅटो सॉस पाहिल्यावर अश्रू अनावर होतात.

Advertisement

या युवतीचे नाव चार्ली एवरेट असून तिला टॉमेटो केचअपवरून सीवियर फोबिया आहे. लाल रंगाचा हा सॉस या युवतीला रडण्यास आणि आरडाओरड करण्यास भाग पाडतो. हा सॉस पाहिला तरीही या युवतीची स्थिती बिघडते. तर सॉसचा वास नाकात गेल्यास तिच्या डोळय़ातून अश्रू वाहू लागतात.

18 वर्षीय चार्ली एवरेटने जर टोमॅटो केचअपची बाटली पाहिली तरीही तिला अत्यंत अस्वस्थ वाटू लागते. एखादे केचअप असलेल्या ठिकाणी ती राहूच शकत नाही. सॉसच्या गंधाबद्दलही या युवतीला समस्या आहे आणि तिने मागील अनेक वर्षांमध्ये टोमॅटो केचअपचे सेवन केलेले नाही. पबमध्ये वेट्रेस म्हणून काम करणाऱया चार्लीला यामुळे अनेकदा समस्या होते, कारण लोक काहीवेळा तिच्याकडेच सॉसची मागणी करत असतात. एकदा तर तिच्या बूटवरच सॉस पडला होता, ज्यानंतर तिने रडून रडून पबमध्ये गेंधळ घातला होता.

फोबिया व्हायरल

फेसबुकवर माझ्या या भीतीबद्दलचा व्हिडिओ अपलोड केला होता. यानंतर एका मित्राने टिकटॉकवर हा व्हिडिओ व्हायरल केला होता, यात चार्लीकडे एक जण केचअप घेऊन येत असल्याचे आणि त्यानंतर ती ओरडू लागल्याचे दिसून येत. चार्लीला केवळ सॉसचा नव्हे तर उलटी होण्याचाही फोबिया आहे. तिला शाळेत शिकत असल्यापासून उलटी होण्याची भीती सतावत असते अणि तिने मागील 10 वर्षांमध्ये कधीच उलटी केलेली नाही. मला यामुळे मोठा त्रास होत असतो, परंतु हे आता माझ्या जीवनाचा भाग ठरले असल्याचे चार्ली सांगते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article