कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रशिया संदर्भात चीनची अमेरिकेवर टीका

06:52 AM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / बीजिंग

Advertisement

रशियाने युक्रेनशी युद्ध येत्या 50 दिवसांमध्ये थांबविले नाही, तर रशियाच्या अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर प्रचंड कर लागू केला जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. मात्र, यामुळे चीनने ट्रंप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अशा प्रकारे दबाव तंत्राचा उपयोग करुन अमेरिका मनमानी करु शकणार नाही, असा इशारा चीनच्या प्रशासनाने अप्रत्यक्षरित्या दिला आहे.

Advertisement

ट्रंप यांनी केवळ रशियालाच असा इशारा दिला आहे असे नसून रशियाशी व्यापार करणाऱ्या इतरही अनेक देशांना हाच इशारा दिला आहे. भारत आणि चीन हे देश रशियाकडून कच्चे इंधन तेल मोठ्या प्रमाणावर विकत घेतात. त्यामुळे रशियाचा आर्थिक लाभ होत आहे. त्यामुळे रशिया युक्रेनशी अद्यापही युद्ध करीत आहे. हे युद्ध थांबवायचे असेल, तर रशियाची आर्थिक शक्ती क्षीण झाली पाहिजे, असे ट्रंप यांचे धोरण असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणून त्यांनी रशियाशी त्या देशाला लाभदायक ठरेल, असा व्यापार केल्यास या देशांवरही मोठा कर लागू केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रशियाशी व्यापार करणारे देशही सावध झाले आहेत. भारताचाही या देशांमध्ये समावेश आहे.

जयशंकर आणि जिनपिंग भेट

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी रात्री उशीरा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. अमेरिकेच्या कर धोरणाचाही विषय यावेळी चर्चेला आला होता, अशी सूत्रांची माहिती आहे. तथापि, दोन्ही नेत्यांनी नेमकी काय चर्चा केली, याविषयी दोन्हीही देशांनी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण केलेले नाही. भारत आणि चीन यांच्या द्विपक्षीय संबंधांवर, तसेच सीमावादाच्या संदर्भातही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली असावी, असे अनुमान आहे. तथापि, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कोणाचा किती व्यापार...

रशियाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये चीनचा रशियाशी व्यापार मोठ्या प्रमाणात वधारला आहे. गेल्या एकाच रशियाने इतर देशांशी जो एकंदर व्यापार केला, त्याच्या 34 टक्के व्यापार केवळ चीनशी केलेला आहे. त्या तुलनेत भारत, तुर्किये आणि बेलारुस या देशांचा रशियाशी व्यापार अत्यंत कमी आहे. अमेरिकेने पुढील 50 दिवसांमध्ये आपला इशारा खरा केला, तर चीनला सर्वाधिक फटका बसू शकतो. तथापि, भारत, तुर्किये आणि बेलारुस या देशांवरही कमी अधिक प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढचे दोन महिने रशिया-युक्रेन युद्ध तसेच जागतिक व्यापार यांच्यासाठी महत्वाचे आहेत.

अमेरिकेत एकमत

रशियाने युक्रेनशी युद्ध थांबवावे, यासाठी अध्यक्ष ट्रंप यांनी जे धोरण अवलंबिलेले आहे, त्यावर अमेरिकेत राजकीय एकमत दिसून येत आहे. ट्रंप यांचा रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमॉव्रेटिक पक्ष, या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या धोरणाचे समर्थन केले आहे. तसेच ट्रंप यांच्या धोरणाला अनुकूल ठरणारा एक प्रस्ताव दोन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अमेरिकेच्या सिनेटमध्ये मांडला आहे. या प्रस्तावावर ऑगस्टमध्ये चर्चा आणि मतदान होण्याची शक्यता आहे.

अद्याप भारताचे नाव नाही, पण...

गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनी साधारणत: पन्नास देशांना ‘करपत्रे’ पाठविली आहेत. त्यांनी कॅनडा, युरोपियन महासंघ आणि इतर काही देशांच्या अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर वाढीव कर लागू केल्याची घोषणा केली आहे. तथापि, अद्याप या देशांमध्ये भारताचा समावेश करण्यात आलेला नाही. भारताची अमेरिकेशी अद्यापही व्यापार करार करण्यासंबंधी चर्चा होत आहे. या चर्चेच्या आठ फेऱ्या पार पडल्या आहेत. तथापि, अद्याप करार दृष्टीपथात नाही. या कराराचे अंतिम प्रारुप सज्ज आहे. मात्र, अद्याप ते मान्य करण्यात आलेले नाही, असेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी काही काळ आव्हानात्मक राहणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article