चीनकडून पहिला ‘बोन ग्लू’ तयार
2-3 मिनिटांत जोडणार तुटलेले हाड
चीनच्या वैज्ञानिकांनी क्रांतिकारक शोध लावला आहे. जगातील पहिला बोन ग्लू (हाडांना चिकटविणारा पदार्थ) तुटलेल्या हाडांना 2-3 मिनिटांत जोडणार आहे. ही सामग्री सीपोंद्वारे प्रेरित आहे, पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजेच 6 महिन्यात हे शरीरात विरघळून जाते, यामुळे मेटल इम्प्लांटची गरज भासणार नाही.
चीनच्या वैज्ञानिकांनी बोन 02 नावाचे बायोमटेरियल विकसित केले आहे, जे हाडांना चिकटवण्यासाठी वापरले जाते. ही सामग्री सीपोंद्वारे प्रेरित असून ते समुद्रात मजबुतीने चिकटते. सीप लाटांनी देखील हलत नसल्याने ते हाडांना रक्ताने भरलेल्या अवस्थेत चिकटवू शकतील का असा विचार डॉ. लिय जियानफेंग यांनी केला. याच विचारातू हा बोन ग्लू तयार झाला. हा ग्लू 200 किलोपेक्षा अधिक चिकटविण्याची क्षमता राखतो. शस्त्रक्रियेदरम्यान याला लावल्याने तुटलेली हाडं 2-3 मिनिटात जोडली जातात. जुन्या प्रक्रियेत धातूचे इम्प्लांट करावे लागत होते, जे हटविण्यासाठी आणखी एका शस्त्रक्रियेची गरज भासत होती. परंतु बोन ग्लू 6 महिन्यात हाड नीट झाल्यावर स्वत:च विरघळून जाते.
बोन ग्लूला शस्त्रक्रियेत लावण्यापूर्वी हा एक चिकट पदार्थ असतो, रक्ताने भरलेल्या वातावरणता हा मजबुतीने चिकटतो. वैज्ञानिकांनी 50 हून अधिक फॉर्म्युले टेस्ट केले आणि शेकडो प्रयोग केले. ही सामग्री बायोसेफ आहे, हाडांना नीट होण्यास मदत करते. चीनच्या वेंजोउमध्ये डॉ. लिन यांच्या टीमने याला विकसित केले. आतापर्यंत 150 हून अधिक रुग्णांवर परीक्षण झाले असून सर्व सुरक्षित आणि प्रभावी आढळून आले. हे हाडांना तुटणे, फ्रॅक्चर आणि ऑर्थोपेडिक सर्जरीत क्रांति घडवून आणले. पारंपरिक इम्प्लांटपासून बचाव होईल, शस्त्रक्रियेचा वेळ कमी होईल.
दरवर्षी जगभरात कोट्यावधी लोक हाड तुटण्याच्या समस्येला सामोरे जातात. पारंपरिक पद्धती महाग आणि वेदनादायी आहेत. धातू इम्प्लांट लावल्याने संक्रमण आणि दुसऱ्या शस्त्रक्रियेचा धोका असतो. बोन ग्लू या समस्येवरील उपाय आहे. हे पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. चीनने याकरता चिनी आणि आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अर्ज केला आहे.