महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुलांनी सर्व प्रकारचे खेळ खेळावे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

11:48 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सांखळी : मुलांनी फक्त क्रिकेट पुरते मर्यादित न राहता इतर सर्व प्रकारचे खेळ मैदानांवर खेळणे आवश्यक आहे. खेळात चांगला सराव केल्यास राष्ट्रीय पातळीवर ही एक खेळाडू म्हणून आपण आपली वेगळी ओळख निर्माण करू शकता. यासाठी सरकार नेहमी सहकार्य करत आहे. तसेच राज्यातील जुने लगोरी (नोपयानी) हा खेळ लुप्त झालेला आहे. या खेळांना ही प्रोत्साहन देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत सर्व प्रकारच्या खेळात आपले भविष्य उज्ज्वल करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कडचाळ भायली फळ येथील सत्यनारायण मंदिर परिसरात आयोजित सुर्ला सरकारी माद्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायतसदस्य गोपाळ सुर्लकर, सरपंच विश्रांती सुर्लकर, पंच सुभाष फोंडेकर, देवस्थान अध्यक्ष आनंद फोंडेकर, मुख्याध्यापक सर्वेश्वर नाईक, पा. शि. संघातर्फे तुळशिदास फोंडेकर, दीपक वळवईकर आणि पालक व शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंदिया मांदरेकर, संयोजक ज्योती सीनारी यांनी केले तर आभार नीलिमा मावळींगकर यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article