महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीमंतांच्या मुलांची शिक्षणासाठी विदेशालाच पसंती

06:51 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आपल्या मुलांचे भवितव्य उज्वल असावे, अशा प्रकारची इच्छा प्रत्येक पालक बाळगत असतो. त्या दृष्टिने तो आपल्या पाल्याची वाढ योग्यतेने होईल याची लहानपणापासूनच पुरेपूर काळजी घेत असतो. शालेय शिक्षणासाठी पालक आपल्या मुलांना भारतातच संधी देत असले तरी त्यांचे पुढील पदवी व उच्चशिक्षण मात्र विदेशातच व्हावे, ही इच्छा भारतीय पालक बहुतेक करुन बाळगून असतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये 75 टक्के श्रीमंत पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविणे पसंत करतात, असे दिसून आले आहे. प्रसंगी आपल्या पाल्याच्या विदेशातील शिक्षणासाठी लाख ते कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी श्रीमंत पालकांची असते, असेही अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. याकरीता आवश्यक वाटल्यास घरदार विकून किंवा कर्ज काढून मुलांना पाठवण्याची व्यवस्था भारतीय पालक करत असतात.

Advertisement

देशात तीन चतुर्थांश संख्येचे श्रीमंत पालक विदेशात आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठविण्यावर भर देत असतात. एचएसबीसी यांनी अलीकडेच एक सर्व्हे केला होता. भारत, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये श्रीमंत पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पाठवितात असे त्या सर्वेत दिसून आले आहे. म्हणजेच उच्च शिक्षणासाठी वरील देश हे लोकप्रिय आहेत हेही या अहवालामध्ये समजून आले आहे. भारतातील पालकांना आजही विदेशातील विद्यापीठांचे शिक्षण हे अधिक प्रगत वाटते, हेही यावरुन दिसून येते. विदेशातील शिक्षणाविषयीचा ओढा आजही भारतीय पालकांमध्ये कायम दिसून येतो. विदेशातील शिक्षणासाठी भारतातील पालक प्रसंगी कर्जही काढतात, असेही दिसून आले आहे. एवढ्यावरच पालक न थांबता आपल्या बचतीतील रक्कमही खर्च करण्याची तयारी पालक ठेवत असतात. यासोबत स्वत:चे घर किंवा जागा विक्री करुनसुद्धा मुलाला विदेशात पाठविण्यासाठी आवश्यक ती रक्कम उभी केली जाते. विदेशातील शिक्षणाचा दर्जा भारतीय विद्यापीठांच्या तुलनेत कैकपट्टीने अधिक असल्याने भारतीय पालक आपल्या मुलांचे उज्वल भवितव्य लक्षात घेऊन विदेशात शिकण्यासाठी पाठवत असतात. ज्या पालकांना मनात इच्छा असूनही आपल्या पाल्याला विदेशात पाठविता येत नाही, अशांना मानसिक तणावाखाली रहावे लागते, असेही एका अध्ययनात दिसून आले आहे. अमेरिकेसह, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, स्पेन, हॉलंड, सिंगापूर, फ्रान्स, इटली या देशांमध्ये भारतीय पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पाठवत असतात. अमेरिकेमध्ये मोठ्या संख्येने भारतीय शिकण्यासाठी जात असतात. तेथे खूप सारे उच्च शिक्षणाचे पर्याय उपलब्ध आहेत. अलीकडेच जर्मनीतही भारतीय मुलांचा ओढा जास्त करुन वाढतो आहे. परवडणारे शिक्षण, संशोधन आणि प्रायोगिक प्रशिक्षणाबाबतीमध्ये जर्मनीत उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. बहुसंस्कृतिक वातावरण आणि उपयुक्त विसा धोरण यामुळे ऑस्ट्रेलिया हा देशही भारतीयांसाठी आकर्षणाचा ठरला आहे. या ठिकाणी अभ्यासक्रमासोबतच नोकरी करण्याच्या संधी उपलब्ध असतात. इंग्लंड हा देशही अत्युत्तम अशा उच्चशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. अभ्यासक्रमापश्चात काम करण्यासाठी या ठिकाणी संधी दिली जात असल्याने अनेक जण या देशात जाणे पसंत करतात. याच सोबत स्पेन देखील भारतीय मुलांना उत्तम उच्च शिक्षणाच्या संधी देऊ करत आला आहे. हॉलंड देशात चांगल्या रँकिंग प्राप्त विद्यापीठांची संख्या जास्त असून पदव्युत्तर उच्च शिक्षणाच्या विपुल संधी येथे उपलब्ध आहेत. शिष्यवृत्ती या ठिकाणी घेऊन शिक्षण पूर्ण करता येते. सिंगापूर, फ्रान्स आणि इटली या तीन देशांमध्ये सुद्धा भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जाण्यास पसंती दर्शवत असतात. एकंदरच या देशांमध्ये भारतीय विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी जाऊन आपले भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी पालकही त्याच्या इच्छांना मूर्त रुप देण्यासाठी प्रसंगी वाट्टेल तो त्याग करायची तयारी ठेवत असतात.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article