For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाल्यांना समजून घेण्यासोबत प्रोत्साहनाची गरज

06:01 AM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाल्यांना समजून घेण्यासोबत प्रोत्साहनाची गरज
Advertisement

आताच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शिक्षण, शैक्षणिक प्रगती आवश्यक आहेच. परंतु आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी केवळ मार्क्स म्हणजे सारे काही आहे असा समज असेल तर तो तपासून पाहायला हवा. खरं तर मुलांचा कल बघून आणि उपजत कौशल्य जाणून त्याप्रमाणे वाटचाल करणे गरजेचे आहे. प्रत्येक मूल खरं तर स्मार्ट असतं आणि प्रत्येकाचं कौशल्यही वेगवेगळं असतं. तसं पाहायला गेलं तर एकाची दुसऱ्याशी त्या अर्थाने तुलना करता येत नाही. परंतु आपण बरेचसे पालक अगदी छोट्या छोट्या गोष्टीत कळत नकळत तुलना करत असतो.

Advertisement

नमस्कार मॅडम! आम्ही पार रडकुंडीला आलोय. काय झालं? आमचा मुलगा अमेय हल्ली अगदी निरीच्छ असल्यासारखा वागतोय. 90 टक्के मिळवणारा हा मुलगा आता फक्त 70 टक्क्यांवर आला. आम्हाला तर काहीच कळत नाहीये. हे असं सुरू राहिलं तर त्याचं करिअर घडायचं तरी कसं? उत्तम मार्क्स नसतील तर विचारणार कोण हो? या मुलांना सर्व सुख सोयी आहेत. कशाचीही कमतरता नाही. सारं असूनही असं होत चाललंय. कितीही बोललं तरी उपयोग शून्यच.

असं केव्हापासून सुरु आहे? याच वर्षी.. आठवीत गेल्यापासून. बरं! अमेयला अभ्यासाव्यतिरिक्त काय आवडतं? गायन. तो गातो छान! गाणं शिकतोय खूप बक्षीसेही मिळवली आहेत त्याने! त्यातच काही करायचं असा त्याचा हट्ट आहे. मॅडम, कला असणे ठीक आहे पण ती पुरणारे का त्याच्या आयुष्याला? मार्क नसतील तर विचारणार कोण तुम्हाला?

Advertisement

मी हसले आणि म्हटले, ‘आपण यावर नंतर बोलू. आधी मला जरा अमेयजवळ बोलायचं आहे त्याला आत पाठवता का? हो...बस अमेय..असं म्हणत त्याला थोडं रिलॅक्स करण्याच्या हेतूने तो गाणे कुठे शिकतोय? त्याने स्पर्धांमध्ये मिळवलेले यश यावर सुरुवातीला चर्चा केली. तो कम्फर्टेबल झाला, हे लक्षात आल्यावर हळूहळू शाळा, अभ्यास या विषयाकडे वळले. अमेय मला सांग ‘अभ्यासात कितीसा रमतोस?’. खरं सांगू मॅडम, पूर्वी मी खूप मन लावून अभ्यास करायचो. पण हल्ली नकोच वाटतो अभ्यास! काही विशेष कारण? कसले टेन्शन आहे का? अमेयचे डोळे पाणावले.

मॅडम.. वर्गात कायम तिसरा नंबर असायचा. 90 टक्के मार्क्स असायचे पण तरीही हे मार्क्स आई-बाबांना कमीच वाटतात. गाणे, क्लास, अभ्यास.. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग हे सर्व मी मनापासून करायचो. तरी पहिला किंवा दुसरा नंबर का नाही? म्हणून आई-बाबा कायमच नाराज! मॅडम, मला गाण्यातच काहीतरी करायचं आहे मी आईबाबांना हे सांगितले तर यांना ते पटतच नाही. सारखी तुलना करतात. मला अभ्यास नको असंच वाटतं आता. काहीही केलं, कितीही केलं तरी ते बोलतातच ना.. मग काही न केलेलं बरं असं म्हणत अमेयला रडूच कोसळले. तो थोडा शांत झाल्यावर त्याच्या कलाने घेत अनेक गोष्टी समजावून सांगितल्या.

त्याच्या आई-वडिलांसोबत चर्चा करणे आवश्यक होतेच. सलग दोन-तीन भेटी मध्ये सविस्तर चर्चा झाली. पालक म्हणून अपेक्षा आणि तुलना करताना आपली गल्लत होते आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आता काय काय आणि कसे बदल करायचे याचा एक कृती आराखडा तयार करून त्यानुसार बदलाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. अमेयही मनापासून समुपदेशनासाठी येऊ लागला.

मूल्य, दृष्टीकोनातील बदल, ध्येयाच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न, प्रयत्नातील सातत्य या गोष्टींना गती आली. पालकांची सततची तुलना, पटकन बोलणं टिन एज, वेगाने होणारे शारिरीक मानसिक बदल या साऱ्यामुळे अमेय अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागला होता. अनेक मुलांच्या बाबतीत हे घडत असते. काही वेळा असेही घडते की मुलं दाखवतात एक आणि त्यांच्या मनात मात्र वेगळच काही दडलेलं असतं.

आपल्या भावना, अनास्था, संताप, अनादर, उदासीनता टाळाटाळ वा नकार या रूपाने ते प्रकट करतात. परंतु त्यांच्या मनातल्या भावना मात्र यापेक्षा तीव्र आणि वेगळ्या असू शकतात. त्या जाणून घेऊन त्यांना योग्य वळण लावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसोटीच असते.

आताच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शिक्षण, शैक्षणिक प्रगती आवश्यक आहेच. परंतु आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी केवळ मार्क्स म्हणजे सारे काही आहे असा समज असेल तर तो तपासून पाहायला हवा.

खरं तर मुलांचा कल बघून आणि उपजत कौशल्य जाणून त्याप्रमाणे वाटचाल करणे गरजेचे आहे.

प्रत्येक मूल खरं तर स्मार्ट असतं आणि प्रत्येकाचं कौशल्यही वेगवेगळं असतं. तसं पाहायला गेलं तर एकाची दुसऱ्याशी त्या अर्थाने तुलना करता येत नाही. परंतु आपण बरेचसे पालक अगदी छोट्या छोट्या गोष्टीत कळत नकळत तुलना करत असतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर.. ज्यावेळी मुलांचा रिझल्ट लागतो आणि प्रोग्रेस कार्ड घेऊन मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा निकाल पाहता क्षणी अनेक पालकांचा प्रश्न काय असतो? अमुक मित्राला वा मैत्रिणीला कोणती ग्रेड मिळाली? अमुक विषयात त्यांना किती मार्क मिळाले? बऱ्याचदा अशा पद्धतीचा संवाद सुरू होतो आणि मग सारं असूनही तुम्हाला अभ्यासच करायला नको अशा सुरावर गाडी येऊन थांबते. आपल्या मुलाची प्रगती व्हावी, त्याने उत्तम यश मिळवावे असं वाटणे स्वाभाविक आहे परंतु प्रत्येकाची बुद्धिमत्ता, कौशल्य ही वेगवेगळी असतात, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं किंबहुना समजून घ्यायलाच हवं. होवार्ड गार्डनर यांनी आठ वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे पैलू मांडले आहेत.

  1. शारीरिक गतिबोधक बुद्धिमत्ता (Bodily kinesthetic)अत्यंत उत्साही, चपळ, खेळण्याची आवड असणारे, खेळण्यांमध्ये गती असणारी अशी मुले! नृत्य खेळ यामध्ये स्मार्ट असतात.
  2. तार्किक गणिती - (Logical/Mathematical intelligence)- क्रमबद्ध विचार करणे, बुद्धिबळ, कोडी यांची नैसर्गिक आवड मुलांना असते.
  3. अवकाशीय/दृश्यात्मक (Spatial/visual)

वेगवेगळे आकार, रचना, नकाशे, शिल्पे, चित्रे, वास्तू रचना याचे पटकन आकलन होते. त्यातले विशेष कौशल्य असते.

  1. सांगीतिक-(Musical intelligence)

संगीत, स्वर-ताल यांचे सहज आकलन, गाणे गुणगुणत राहणे, ताल धरणे, सहज सुंदर गाणे ही वैशिष्ट्यो असतात.

  1. भाषिक बुद्धिमत्ता-(थ्ग्हुल्ग्stग्म् घ्हात्त्ग्gाहम) भाषेची चांगली जाण, शब्द संपत्तीचा खजिना, एखादी भाषा पटकन आत्मसात करणे वगैरे वैशिष्ट्यो असतात. ही मुले तसे शब्दप्रभूच असतात.
  2. निसर्गविषयक बुद्धिमत्ता-(ऱूल्raत्ग्stग्म्s घ्हात्त्ग्gाहम) निसर्गाची आवड, जाणीव, प्राणी-पक्षी, वृक्ष यांची पटकन ओळख पटणे, निसर्ग सान्निध्यात रमणे, ही वैशिष्ट्यो असतात.
  3. आंतरवैयक्तिकबुद्धिमत्ता-(ग्हीजेदहत्) दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे, योग्य प्रतिसाद देणे, जुळवून घेणे, समाजभान चांगले असणे.
  4. व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता-स्वत:च्या भावनांची चांगली ओळख असणे. आपली क्षमता ओळखून त्यानुसार निर्णय घेता येणे, स्वत:वर नियंत्रण ठेवणे या कौशल्यांना व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता असे म्हणता येईल. मुलांमधील अशी कौशल्य जाणून घ्यायला हवी. योग्य मार्गदर्शन, जिद्द, परिश्रम, सातत्य याची या कौशल्याला, कलेला जर जोड मिळाली तर तेच कौशल्य, कला माणसाला नाव देते आणि जीवनाला पुरून उरेल एवढी समृद्धी देते. आघाडीच्या अनेक कलाकारांच्या बाबतीत याचा पडताळा करता येईल.

ज्या पद्धतीने आपण मुलांचे मार्क्स, शैक्षणिक प्रगती याबाबत कायम लक्ष ठेवून असतो तसेच आपल्या पाल्याचा कल, विशेष कौशल्य काय आहे हे जर सुरुवातीपासून जाणून घेत त्या दिशेने प्रोत्साहन दिले तर खऱ्या अर्थी मुलांचा प्रवास यशाचा दिशेने होईल हे मात्र निश्चित!!

-अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.