मुलांना देत आहेत श्वानांची नावं
अजब सुरु झाला आहे ट्रेंड
हिंदी चित्रपटांमध्ये राहुल आणि राज ही नाव सर्रासपणे आढळून येतात. तर चित्रपटांमध्ये पाळीव श्वानांना टफी आणि टॉमी अशी नावे दिसून येतात. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये याच नावांचा वापर झाला आहे. परंतु ही नावे जर माणसांना देण्यात आली तर काय घडेल याचा विचार करा. सध्या एक नवा ट्रेंड सुरू झाला असून आता आईवडिल स्वत:च्या मुलांना श्वानांची नावं देत आहेत. परंतु हा ट्रेंड भारतात नव्हे तर विदेशात अधिक दिसून येत आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या कॉलीन स्लेगन ही नेमिंग बी नावाच्या कंपनीची मालकीण आहे. तिचे काम आईवडिलांना मदत करणे आहे. ती मुलांकरता नावं सुचविण्यास दांपत्यांना मदत करते. या सेवेकरता ती 1500 डॉलर्स ते 10 हजार डॉलर्सपर्यंतचे शुल्क आकारते.
आता आईवडिल स्वत:च्या मुलांना श्वानांची नावं देऊ इच्छितात असे कॉलीनने सांगितले आहे. लोक मी सुचविलेल्या नावांची चेष्टा करतात, आता पालक मुलांना श्वानांची नावे देऊ इच्छितात, ही काही वाईट गोष्ट नाही, तर एका प्रकारचे कॉम्प्लिमेंट असल्याचे ती सांगते.
कॉलीन स्वत:च्या ग्राहकांना श्वानांची नावं सुचविते, आर्ची, चार्ली, डेजी, लूना, लियो यासारखे नावे चर्चेत असतात. याचबरोबर कूपर, मावरिक आणि ड्यूक यासारखी नावे अत्यंत सन्मानजनक असतात. अनेक लोक काही नावं ही श्वान आणि माणसांसाठी देखील चालू शकतात हे मान्य करतात.