महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रावणात विद्यार्थ्यांना अंड्यांऐवजी चिक्की-केळी

11:30 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंड्यांऐवजी चिक्की खरेदी करण्याचा निर्णय

Advertisement

बेळगाव : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. हिंदूधर्मीय या काळात मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे शाळांमध्येही अंड्यांऐवजी चिक्की अथवा केळ्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे शाळांच्या मागणीनुसार श्रावणात अंड्यांऐवजी चिक्की व केळ्यांचे वितरण केले जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनवेळा अंडी व चिक्की दिली जाते. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्यामुळे राज्य सरकारने मागील शैक्षणिक वर्षापासून अंडी वितरण करण्याचा निर्णय घेतला. परंतु, शाकाहारी पालकांकडून विरोध होऊ लागल्याने राज्य सरकारने जे विद्यार्थी अंडी खात नाहीत, त्यांना चिक्की अथवा केळी देण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार मागील संपूर्ण वर्षात याचे वितरण सुरूहोते. मागील महिन्यात झालेल्या मध्यान्ह आहार विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना सूचना करत अंड्यांवर भर देण्यास सांगितले होते. परंतु, आता श्रावण महिना सुरू झाल्याने मांसाहार करणाऱ्यांची संख्या कमी असते. यासाठी शाळांकडून चिक्कीची मागणी करण्यात आली आहे. एसडीएमसी कमिटी व मुख्याध्यापकांनी एकत्रितरीत्या अंड्यांऐवजी चिक्की खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागीलवर्षाप्रमाणे यावर्षीही चिक्की खरेदी केली जाणार आहे.

Advertisement

अंड्यांपेक्षा चिक्कीलाच पसंती...

अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्यामुळे मध्यान्ह आहार विभागाकडून विद्यार्थ्यांना अधिकाधिक अंडी देण्याची सूचना मुख्याध्यापकांना करण्यात आली आहे. परंतु, अंड्यांपेक्षा विद्यार्थीवर्गातून शेंगदाणा चिक्कीलाच जास्त मागणी असल्याचे दिसत आहे. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत, अशा विद्यार्थ्यांना चिक्की अथवा केळी दिली जातात. परंतु, अंडी व केळ्यांपेक्षा चिक्कीलाच अधिक पसंती मिळत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article