महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्र्यांचे मोले पंचायत क्षेत्रात घर चलो अभियान

11:49 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फोंडा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘घर चलो अभियाना’तंर्गत रविवारी सायंकाळी मोले पंचायत क्षेत्रातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी स्थानिक आमदार गणेश गांवकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सावर्डे भाजपा मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, तसेच मोले पंचायत मंडळ उपस्थित होते. अभियानाची सुऊवात झरीवाडा मोले येथून करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला, युवा व किसान शक्ती तसेच गरीब कल्याण शक्ती हे चार स्तंभ डोळ्यांसमोर ठेऊन काम करीत आहेत. महिलांसाठी त्यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविल्या आहेत. महिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक त्यांनी संसदेत आणून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांवर अत्याचार होऊन नये, यासाठी तीन तलाख विधेयक त्यांनी संसदेत मंजूर केले. युवा शक्तीसाठी खेलो इंडिया, स्कील इंडिया सारख्या योजना अंमलात आणल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड व अन्य महत्त्वाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. गरीबांच्या कल्याणासाठी अनेक कुटुबांना मोफत धान्य देण्याची योजनाही त्यांनी अंमलात आणली. येत्या पाच वर्षांत देशातील गरीबी दूर करण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत, असे मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना संबेधत करताना म्हणाले.

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. विकसित भारताचे स्वप्न नजरेसमोर ठेऊन पंतप्रधान मोदी काम करीत आहेत. यासाठी त्यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार पुन्हा केंद्रात सत्तेत आले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने त्यांचे पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. गोवा सरकारनेही अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. दिव्यांगाना मदत व्हावी यासाठी गोव्यात खास विभाग सुऊ करण्यात आला आहे, असे सांगून सध्या दक्षिण गोव्याचे खासदार कुठेही दिसत नाहीत. केवळ निवडणुकीच्या वेळी काँग्रेस उमेदवार लोकांच्या दारात येतात. मोलेसारख्या भागात त्यांनी कितीवेळा भेटी दिल्या असा प्रश्न उपस्थित करीत, गेल्या पाच वर्षांत त्यांनी खासदार निधीचा वापर कुठे केला, हे जाहीररित्या सांगावे असे आव्हान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

Advertisement

आमदार गणेश गावकर म्हणाले, मोले पंचायतीने नेहमीच भाजपा सरकारला पाठिंबा दिला आहे. तसाच पाठिंबा भविष्यात कायम राहणार आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली सावर्डे मतदार संघाचा विकास झपाट्याने होत आहे. यासाठी पुन्हा केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले पाहिजे. ‘अबकी बार चारसौ पार’ या घोषणेला प्रतिसाद देताना दक्षिण गोव्यातील भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन आमदार गांवकर त्यांनी केले. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. आपण खास कऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो असून त्यावर तोडगा काढणे आपले कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या अभियानातंर्गत त्यांनी ज्येष्ठ रंगकर्मी आपा गावकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. अन्य नागरिकांच्याही भेटी घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण गावकर यांनी तर कपिल नाईक यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article