For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियात पळ काढणार मुख्यमंत्री मान : बादल

07:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियात पळ काढणार मुख्यमंत्री मान   बादल
Advertisement

अमृतसर : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी पंजाबमधील भगवंत मान सरकारवर टीका केली आहे. आप सरकारने डिंपी ढिल्लों यांच्यावर दबाव टाकल्यानेच त्यांनी अकाली दल सोडत आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री मान हेच आता ऑस्ट्रेलियात पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मान हे ऑस्ट्रेलियात जमीन खरेदी करत आहेत. 2027 च्या निवडणुकीत ते पंजाबमधून पळ काढतील. मान जेथे कुठे जातील, तेथे त्यांना पकडत पंजाबमध्ये परत आणले जाईल. मान सरकारच्या सर्व भ्रष्टाचारांची चौकशी करविण्यात येईल असे बादल यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.