महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सात शिक्षकांना ‘मुख्यमंत्री वशिष्ट गुरू’

11:17 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज कला अकादमीत गौरव

Advertisement

पणजी : दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील सात उत्कृष्ट शिक्षकांना ‘मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी मोपा-पेडणे येथील सरकारी माध्यमिक शाळेचे शिक्षक महेश कशाळकर, पैंगीण-काणकोणच्या सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका प्रतिमा गावकर, इब्रामपूर- पेडणे येथील सातेरी विद्यामंदिर शाळेचे शिक्षक सुधीर नाईक, सुर्ला-डिचोली येथील रामनाथ नाईक मेमोरियल सरकारी विद्यालयाच्या कला विषयाच्या शिक्षिका ज्योती सिनारी, म्हार्दोळ-प्रियोळ येथील एसएसएम स्वास्तिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिरीषकुमार आमशेकर, कुजिरा येथील वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिरीष भिडे व कोलवाळ येथील डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल पार्सेकर यांची निवड झाली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज गुऊवारी 5 सप्टेंबर रोजी कला अकादमी या ठिकाणी सकाळी अकरा वाजता पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन आयोजित केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर शिक्षकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री वशिष्ठ गुऊ’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article