महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधानांच्या सभेसाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

01:16 PM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : गोव्यात लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करून भाजपने विरोधी काँग्रेसला जबरदस्त आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. ही सभा यशस्वी व्हावी यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जुवारीनगर येथील बिटस् पिलानी कॅम्पस्जवळील खुल्या जागेत शनिवार 27 रोजी संध्याकाळी 5 वा. होणार आहे. ही सभा उत्तर आणि दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी होत आहे. यापूर्वी मडगाव कंदब बस स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा भाजपने आयोजित केली होती. या सभेला सुमारे 25 हजार लोकांचा प्रतिसाद लाभला होता. ही सभा म्हणावी तशी यशस्वी झाली नसल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्या दिवशी उत्साही दिसले नव्हते.

Advertisement

मडगावात घेतली बैठक

Advertisement

मात्र, आता लोकसभा निवडणुकीचा माहोल असून ही सभा यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जातीने लक्ष घालत आहे. काल मंगळवारी संध्याकाळी मडगाव भाजप कार्यालयात दक्षिण गोव्यातील भाजपच्या सर्व मंडळ अध्यक्ष तसेच मंडळांचे इतर पदाधिकारी, दक्षिण गोवा भाजप समिती तसेच भाजपच्या इतर संघटनांची बैठक घेऊन सभा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या सभेतून शक्तिप्रदर्शन घडवून काँग्रेस आघाडीला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे. दक्षिण गोव्यातील 20 मतदारसंघांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणावे अशी सूचना काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. दक्षिण गोवा भाजप समिती तसेच सर्व मंडळ अध्यक्ष व स्थानिक आमदार व मंत्र्यांवर देखील ही सभा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article