महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा उद्या वाढदिवस

12:55 PM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यातील नियोजित कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा बुधवारी 24 एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार असून, वाढदिवसानिमित्त नियोजित केलेल्या कार्यक्रमांचे वेळापत्रक मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केले आहे. वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सावंत हे 24 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत साखळी येथील त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत मडगाव केटीसी बसस्थानकासमोरील भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 ते 3 या वेळेत मुख्यमंत्री आल्तिनो-येथील महालक्ष्मी या सरकारी निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत म्हापसा येथील भाजपच्या उत्तर गोवा कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री सावंत उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article