महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओंकार पाटीलच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून भरपाईचा आदेश

10:58 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : दोन दिवसांपूर्वी मार्कंडेय नदीत वाहून गेलेल्या अलतगा येथील ओंकार अरुण पाटील (वय 24) या तरुणाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच लाखाच्या  भरपाईचे आदेशपत्र दिले आहे. सोमवारी पूरग्रस्त गोकाक व चिकोडी तालुक्याचा दौरा आटोपून बेळगावला परतल्यानंतर सांबरा विमानतळावर ओंकारच्या आईची भेट घ ऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना भरपाई मंजूर केल्यासंबंधीचे पत्र दिले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. यावेळी ओंकारची आई सुरेखा पाटील, वडील अरुण पाटील, भाऊ कार्तिक आदी विमानतळावर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article